ETV Bharat / state

दहावी नापास मुन्नाभाईनं संपूर्ण मराठवाड्यात पसरविलं गर्भलिंग निदानाचं जाळं, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR crime - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR CRIME

Chhatrapati Sambhajinagar Crime News : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, भोकरदननंतर आता थेट जालना आणि बीडपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात दहावी नापास असलेल्या बनावट डॉक्टरचादेखील पर्दाफाश झाला.

Chhatrapati Sambhajinagar crime news pregnancy test racket in marathwada
दहावी नापास मुन्नाभाईनं संपूर्ण मराठवाड्यात पसरविलं गर्भलिंग निदानाचं जाळं, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 2:21 PM IST

पोलीस निरीक्षक राजेश यादव (reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar Crime News : चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेनं शहरात अवैधरीत्या गर्भपात करणारं सेंटर उघड केलं. त्याचे धागेदोरे आता सिल्लोड मार्गे थेट जालना आणि बीड पर्यंत जाऊन पोहोचलेत. जानेवारी महिन्यात गेवराईमधून पोलिसांच्या छाप्यात धक्का देऊन पसार झालेला डॉ. सतीश गवारे हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गर्भपाताचे डॉक्टर आणि एजंटच्या संपर्कात होता. संपूर्ण मराठवाड्यात आवश्यकतेनुसार गर्भलिंगनिदानासाठी जात होता. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंगनिदानासाठी 55 हजार रुपये, तर स्थानिक पातळीवर 30 ते 40 हजार रुपये दर आकारत होता. पुंडलिकनगर पोलिसांनी शहरातील गुन्ह्यातही त्याला आरोपी केलं असून, त्याचा नव्यानं शोध सुरू झालाय.

दहावी नापास झाला डॉक्टर : मूळ जालन्याचा असलेला सतीश गवारे दहावी नापास आहे. मात्र, स्वतःला बीएएमएस डॉक्टर सांगून तशी बनावट डिग्रीदेखील तो दाखवत होता. जून 2022 मध्ये गर्भपातादरम्यान एका महिलेच्या मृत्यूनंतर याचा हा कारभार उघडकीस आला. त्यातून जामिनावर सुटल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये गर्भपाताच्या रॅकेटमध्ये तो रंगेहाथ पकडला गेला. मात्र, तेव्हा पसार झाल्यापासून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 1 लाख 75 हजार रुपयांचे मशीन आणि 25 हजारांचे बडॉमिनल अल्ट्रा साउंड प्रोब अडॉप्टरद्वारे तो लिंगनिदान करायचा. बीड पोलिसांच्या तपासात जवळपास 2 वर्षांचे रेकॉर्ड सापडले होते.

सिल्लोड तालुक्यात सापडले अवैध रुग्णालय : संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं गारखेडा भागात अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आणले होते. त्याचा तपास पुंडलिकनगर पोलिसांनी सुरू केला. त्याचे अनेक धागेदोरे आणि धक्कादायक माहिती समोर येत गेली. त्यात सिल्लोड मध्ये डॉ रोशन ढाकरे आणि डॉ. किरण ढाकरे हे डॉक्टर दांपत्य प्रसुतीची परवानगी नसतानाही, अवैध गर्भपात करत असताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलासह 10 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली. तर गेल्या सात दिवसांपासून या रॅकेटचा पाठपुरावा करण्यात पोलिसांना यश आलंय. एक मोठा रॅकेट पोलिसांच्या हाती लागले. सिल्लोड येथील रुग्णालयात अवैध गर्भपात झाल्यावर मोकळ्या जागेवर अभ्रकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलीय.

छत्रपती संभाजी नगर शहरातील गारखेडा परिसरात असणाऱ्या देवगिरी अपार्मेंट या उच्चभूमी वसाहतीमध्ये गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आरोग्य विभागानं आणि पुंडलिक नगर पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करत गर्भलिंग निदान सेंटर उद्धवस्त केले. याप्रकरणी पॉलिटेक्निक करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 12 लाख 78 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आणि गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणार असलेल्या लॅपटॉप, सोनोग्राफी मशीन, मोबाईल आणि इतर काही केमिकलदेखील पोलिसांनी जप्त केलं होतं. जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात असणाऱ्या बकवा नगर भागातगर्भपात आणि गर्भलिंग निदान सेंटर चालविणाऱ्या फरार आरोपी आशा वर्कर वैशाली जाधव हिला 4 महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी औषधी आणि किट पुरविणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केलंय. वैशालीनं राहत्या घरी सुरभी मदर केअर सेंटर स्थापन करून अवैधरित्या गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता. या प्रकरणी वैशालीची कसून चौकशी केली. तिनं गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या सुनील मेघारे आणि डॉक्टर गणेश सवंडकर यांना दिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून गर्भपाताच्या 93 गोळ्यांची किट जप्त करून गुन्हाही दाखल केला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. WOMENS FREEDOM REPRODUCTIVE AUTONOMY : गर्भपाताबरोबरच पुनरुत्पादकतेच्या कठीण निर्णयात स्त्रीची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य महत्वाचे
  2. SC On Pregnancy Termination Case : 26 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याचे प्रकरण; सुप्रीम कोर्ट म्हणाले, आम्ही मुलाला मारू शकत नाही...
  3. Bombay High court News : बलात्कार पीडितेच्या 29 आठवड्यांच्या गर्भपाताला मंजुरी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.