ETV Bharat / state

विशाळगडाच्या अतिक्रमण मुक्तीसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल; पण उद्या गडावर जाणारच- संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार - Vishalgad Encroachment Issue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:59 PM IST

Vishalgad Agitation Issue : आता विशाळगडावरील अतिक्रमणमुक्तीसाठी माझ्यावर गुन्हा जरी दाखल झाला तरी चालेल; परंतु उद्या मी विशाळगडाच्या दिशेनं मार्गस्थ होणार असल्याचा निर्धार स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा काय म्हणाले संभाजीराजे?

Vishalgad Agitation Issue
संभाजीराजे (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Vishalgad Agitation Issue : आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सिद्दीचा वेढा भेदून विशाळगडावर पोहोचले होते. सर्व शिवभक्तांनी उद्या विशाळगडावर जावं अशी विनंती केली. त्यानुसार उद्या सकाळी 8 वाजता विशाळगडावर जाणार आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावं यासाठी अनेक प्रयत्न झाले. दीड वर्षांपूर्वी दुर्गराज रायगडावरील राजसदरेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, "तुमच्या मनातील विशाळगड घडवू; मात्र गेली दीड वर्ष कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंतही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

विशाळगडाच्या अतिक्रमण मुक्तीविषयी बोलताना छत्रपती संभाजीराजे (ETV Bharat Reporter)

मला त्याची खंतच, राजांचा उद्‌गार : मी दोन वर्षांपूर्वी गेल्यानंतर मला देखील तिथलं चित्र बघून वाईट वाटलं. विशाळगडावर ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं अतिक्रमण झालं आहे. सरकारचं देखील अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. विशाळगडावर बकरी, कोंबड्या कापल्या जात होत्या, हे सगळं बंद व्हावं ही शिवभक्तांची मागणी आहे. आम्ही शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी उद्या गडावर जाणार आहोत. विशालगडावरील अतिक्रमण काढावं ही मागणी आहे. दीड वर्षांत सरकारनं काय केलं? कोर्टात याबाबत सुनावणी लावली नाही. सरकारनं काय केलं ते सांगावं? विशाळगडावर 158 अतिक्रमणे आहेत. केवळ 6 अतिक्रमणाबद्दल कोर्टात केस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर हे कसं काय खपवून घेतलं जातं? मी इतकी वर्षे विशाळगडावर गेलो नाहीत याची देखील मला खंत वाटते, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

किल्ल्याचा राजकारणासाठी उपयोग नाही : संभाजीराजे पुढे म्हणाले की, अतिक्रमण प्रकरणावर एक देखील सुनावणी झाली नाही. दीड वर्षांत सुचलं नाही आणि मी विशाळगडावर जाणार ही घोषणा केल्यानंतर बैठकीला बोलवता का? मी जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. माझ्यावर कोण बोट दाखवू शकत नाही. रायगड किल्ल्याचा मी एक टक्का देखील राजकारणासाठी उपयोग करून घेतलेला नाही. आता माझ्यावर राजकारण करतो असे आरोप करतात हे चुकीचं आहे. मी कधीही गडकोट किल्ल्याचा राजकारणासाठी उपयोग केलेला नाही आणि यापुढे देखील करणार नाही असंही छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले.

पुरातत्त्व खात्याबद्दल प्रश्नचिन्ह : विशाळगड पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील गडकोटांवरील दगड हलवण्याची परवानगी नसताना ग्रामपंचायतीने या ठिकाणी पूल कसा उभारला? पुरातत्त्व खात्याचे नियम असताना इथं का नियम लावला नाही? स्थानिक आमदारांनी हे दबाव टाकून केलं का अशी शंका मनात येते. या सगळ्याची सुरुवात स्थानिक आमदार विनय कोरे यांनी केलीय. महायुतीत गेल्यामुळे तुम्ही दबाव टाकून काहीही करणार का? महाराणी ताराराणी साहेब यांनी 7 वर्षे औरंगजेब विरोधात लढाई केली. औरंगजेबसुद्धा विशाळगड कसा आहे हे पाहण्यासाठी आला होता; कारण त्याच ठिकाणाहून ताराराणींनी स्वराज्याची राजधानी म्हणून काम पाहिलं आहे; मला काही शिवभक्तांनी पत्र पाठवून सांगितलं की, तिथं कुणी अतिरेकी त्याठिकाणी राहायला होता, असंही पत्रांमध्ये नमूद असून हे प्रकरण गंभीर असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा :

  1. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi
  2. मुंबईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न; विरोधकांचा घेतला खरपूस समाचार - PM Narendra Modi in Mumbai
  3. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.