मुंबई CHHAGAN BHUJBAL : राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केलीय. मी नाशिकमधून निवडणून लढणार नल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून माझ्या नाव सुचवल्याबद्द त्यांचे आभार मानतो, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. नाशिकच्या विकासासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलयं. त्यामुळं मी आता महायुतीच्या नेताचा प्रचा र करणार असल्याचं भुजबळांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा : पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले, 'नाशिक लोकसभेसंदर्भात अजित पवार यांनी मला होळीच्या दिवशी फोन केला. दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी नाशिकसाठी समीर भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र, अमित शाह यांनी माझं नाव घेतलं. मात्र, हेमंत गोडसे खासदार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण, भुजबळ नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढतील, असं अमित शाह त्यावेळी म्हणले.
महायुतीचा उमेदवार जाहीर करा : पुढे बोलताना भुजबळ यांनी नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार तातडीनं जाहीर करण्याची मागणी केलीय. 'अजित पवारांशी बोलून मी नाशिकला जाऊन पाहणी करून कामाला लागलो होते. आता उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. दिल्लीतील बैठकीबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळं चर्चेनुसार जागा जाहीर व्हायला हवी होती. आता ३ आठवडे झाले आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळं या मतदारसंघात कोण लढणार? उमेदवार कोण? असणार हे त्वरित जाहीर करावं. अन्यथा, समस्या उद्भवेल. कारण विरुद्ध पक्षाचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.', असं ते म्हणाले.
हेमंत गोडसे कडून भुजबळाच्या निर्णयाचं स्वागत : तसंच, 'जेवढा उमेदवार घोषित उशीर होईल, तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं याबाबत लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे. माझ्या नावाचा आग्रह धरल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचा आभारी आहे. मी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला गेलो. त्यामुळं मी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काम करणार आहे.' असं छगन भुजबळ यांनी स्पष्टपणं सांगितलं. दरम्यान, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानं आता हेमंत गोडसे हे महायुतीकडून नाशिकमधून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
हे वाचंलत का :
- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 Live Update
- तर ठरलंय! दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपा लढणार; ठाण्यात शिंदे गटानं थोपटले दंड - Lok Sabha Election 2024
- महायुतीच्या वेगळ्या जाहीरनाम्याची शक्यता नाही; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती - Lok Sabha Election 2024