मुंबई Mumbai Airport Fire : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना टळली. विमानातून अवैधपणे नेण्यात येत असलेल्या केमिकलनं (Chemical) अचानक पेट घेतला. काहीजणांनी छुप्या पद्धतीनं विमानात केमिकल नेण्याचा प्रयत्न केला. पण, केमिकल विमानात लोड होत असताना आग लागल्याचं समोर आल्यानं मोठी दुर्घटना टळली.
पाच जणांना अटक : फॉरेन्सिक तपासणीत केमिकल हायड्रोजन स्पिरीट असल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती सहार पोलीस ठाण्याचे (Sahar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांनी दिली आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली : मुंबई विमानतळ हे खूप व्यस्त विमानतळ म्हणून ओळखलं जातं. हजारो विमानं येथून उड्डाणं करतात आणि लँडसुद्धा होतात. तसंच रोज लाखो प्रवासी येथून प्रवास करत असतात. कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील या विमानतळाला आहे. तरीसुद्धा विमानातून अवैधपणे नेण्यात येत असलेल्या केमिकलनं अचानक पेट घेतल्यानं मोठी आग लागली. अदिसअबाबा ET-641 या विमानातून हे केमिकल नेण्यात येणार होतं. मुंबई विमानतळावरील सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं यावेळी दिसून आलं.
अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात : विमानात केमिकल लोड होत असताना आग लागल्याचं समोर आल्यानं मोठी दुर्घटना टळली. ही घटना मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली. नंतर फॉरेन्सिक तपासणीत केमिकल हायड्रोजन स्पिरीट असल्याच निष्पन्न झालं. अदिसअबाबा ET-641 या विमानातून केमिकल नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सहार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुंबई विमानतळावरील सुरक्षेत मोठी चूक झाली असल्याचं देखील प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबई विमानतळावरील एका चुकीमुळं अनेक प्रवाशांचे जीव धोक्यात आले असते.
हेही वाचा -
नाशिकमध्ये सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी - fighter plane crashes