मुंबई CA Bakul Modi on Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असला तरी महाराष्ट्र व मुंबईच्या वाट्याला काहीच आल्याचं दिसत नाही. तर दुसरीकडे ज्यांच्या पाठींब्यावर मोदी सरकार उभे आहे त्या नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या राज्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात चार्टर्ड अकाउंटंट बकुल मोदी यांनी सविस्तर बातचीत केली आहे.
काय म्हणाले बकुल मोदी? : अर्थसंकल्पावर बोलताना बकुल मोदी म्हणाले, "एकंदरीत बघितलं तर हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तराचा विचार करण्यात आला आहे. 2047 च्या विकसित भारताकडे लक्ष ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अनेक योजनांचा पाऊस या अर्थसंकल्पात पाडण्यात आला असला तरी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचतात का? हे पाहणं फार महत्त्वाचं आहे." त्याचप्रमाणे युवक व महिलांना या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आल्याचं बकुल मोदी म्हणाले. तसंच युवकांसाठी रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासोबतच 500 नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप सुविधा करुन देण्यात आली आहे. कर प्रणालीमध्ये सुद्धा बदल करण्यात आल्यानं त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना नक्कीच होणार असल्याचंही मोदी म्हणाले.
आध्र प्रदेश, बिहारवर विशेष लक्ष : विशेष म्हणजे पहिल्यांदा मोदी स्वबळावर सत्तेत आलं नसल्यानं त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. यात आंध्र प्रदेश व बिहार ही दोन राज्य महत्त्वाची असून चंद्रबाबू नायडू व नितेश कुमार यांच्यावर मोदी सरकारनं या अर्थसंकल्पात मोठी मेहरबानी दाखवली आहे. आंध्रप्रदेश साठी 15 हजार कोटी तर बिहार साठी 58 हजार कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र तसंच मुंबईसारख्या शहराला दुर्लक्षित करण्यात आलं आहे. सर्वात जास्त टॅक्स हा केंद्राला मुंबई कडून देण्यात येतो. परंतु त्याच मुंबई, महाराष्ट्राला दुर्लक्षित केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा :
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 : देशात काय स्वस्त काय महाग? जाणून घ्या एका क्लिकवर - Union Budget 2024
- अर्थसंकल्पात युवकांसाठी 'पंतप्रधान पॅकेज'; पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून मिळणार 15000 रुपये - India Budget 2024
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली विकसित भारताच्या 9 प्राधान्यक्रमांची माहिती - Nirmala Sitharaman budjet news