ETV Bharat / state

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निवडणूक प्रचारात; "ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती" - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचा गंभीर आरोप भाजपानं केलाय. उद्धव ठाकरेंनी त्यांची मशाल दहशतवाद्यांच्या हातात दिलीय. त्यांचा देशासह मुंबई पेटवण्याचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. याला अमोल कीर्तिकर यांनीही प्रत्युत्तर दिलंय.

Lok Sabha Election 2024
निवडणूक 2024 (ETV Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 5:57 PM IST

Updated : May 9, 2024, 6:41 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, राज्यात मतदानाचे दोन टप्पे अद्याप बाकी आहेत. त्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचा निर्णय 20 मे रोजी शेवटच्या टप्प्यात होणार आहे. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मुंबईत उत्तर पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सामील झाल्यानं भाजपानं ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंची मशाल दहशतवाद्यांच्या हाती असल्याचा आरोप यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

बॉम्बस्फोटातील आरोपी प्रचारात : शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत असून, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. वेगवेगळे मुद्दे घेऊन एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल कीर्तिकर यांचा प्रचार 1993 बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान करत असल्याचा आरोप केलाय.

अमोल कीर्तिकर यांचं स्पष्टीकरण : "आपण त्याला ओळखत नसून, अशाप्रकारे आक्षेपार्ह फिरणाऱ्याला पोलिसांनी हटकायला हवं होतं. भाजपाचं माझ्या प्रचारावर आणि माझ्या रॅलींवर जास्त लक्ष असावं, याला कारण म्हणजे प्रचारात आम्ही घेतलेली आघाडी. प्रचार फेरीच्या दरम्यान शेकडो लोक सामील होत असतात. एखादा व्यक्ती कोण याची कल्पना आम्हाला नसते. आमच्या रॅलीबरोबर पोलीस देखील उपस्थित असतात. अशावेळी त्यांनी आक्षेपार्ह फिरणाऱ्यांना ताब्यात घेणं अपेक्षित होतं," असं म्हणत अमोल कीर्तिकर यांनी भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले बावनकुळे? : "उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हातात गेलीय. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या समर्थनात इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचार करत आहे. तो मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो-उदो मोठ्या प्रमाणात झाला. आता तर थेट निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून ठाकरे गटाचा प्रचार केला जात आहे," असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केलाय.

देशासह मुंबई पेटवण्याचा प्लॅन : "1993च्या स्फोटानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला संरक्षण दिलं. मात्र, आज उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. त्यामुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटायला हवी. उद्धव ठाकरेंनी त्यांची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन, पुन्हा मुंबईसह देश पेटवण्याचा त्यांचा प्लॅन आहे का?" असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे स्पष्टीकरण द्यावं : "अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात 1993 मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी सहभागी झाल्यामुळं उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं. प्रखर हिंदुत्वाचा विचार ज्वलंत करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. 1993 बॉम्बस्फोटामधील आरोपी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करतोय, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी आता तरी यातून काही बोध घेत याबाबत स्पष्टीकरण द्यावं," अशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांचं राजनाथ सिंहांशी काय बोलणं झालं ; प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Prakash Ambedkar Slams Sharad Pawar
  2. अजित पवार म्हणूनच बाहेर पडले, देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल - Devendra Fadnavis On NCP
  3. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस; काय आहे प्रकरण? - Sudhakar Badgujar

Last Updated : May 9, 2024, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.