ETV Bharat / state

"ओबीसीचे अ, ब, क, ड असे गट पाडले तर मराठा समाजालाही फायदा..." चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान - Chandrakant Patil On Reservation - CHANDRAKANT PATIL ON RESERVATION

Chandrakant Patil : मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्गीयांमधील उपवर्गीकरणाला परवानगी दिली. त्याबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Chandrakant Patil On Maratha Reservation
मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 5:44 PM IST

Updated : Aug 5, 2024, 9:53 AM IST

अमरावती Chandrakant Patil On Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये अ, ब, क आणि ड असे गट पाडून त्यांना आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भात निर्णय दिला. यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, "चाळीस-पन्नास जातींमध्ये स्पर्धा करण्याऐवजी आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या खिशात जे काही साडेआठ ते दहा टक्के आरक्षण मिळतं. त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. हे सर्वांच्या फायद्याचं राहणार आहे."

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, " ओबीसीमध्येदेखील गट पडावे यासाठी केंद्र शासनाने रोहिणी कमिशन गठीत केलं होतं. या कमिशनच्या अहवालानुसार ओबीसी मध्ये अ, ब, क, ड असे गट पाडले तर यामध्ये कुणबी सह आणखी 50 जाती असतील. यामुळे प्रत्येक जातीला चार साडेचार टक्के आरक्षण मिळू शकते."

जरांगे पाटलांनी ऑन टेबल बसावं : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त चंद्रकांत पाटील अमरावतीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "ओबीसीमध्ये अ, ब, क, ड गट पाडले तर सर्वांना कसा लाभ मिळेल? हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी मनोजर जरांगे पाटील यांनी ऑन टेबल बसायला हवं. आपलं भलं कशात आहे? कोर्टात काय टिकेल? घटनेच्या चौकटीत काय बसेल? याचा विचार करायला हवा. जरांगे पाटील यांना याबाबत काही शंका असेल तर त्यांनी आपले चार वकील घेऊन यावं. मी एकटाच याबाबत मुद्दे मांडायला तयार आहे. 2014 ते 2019 दरम्यान मराठा आरक्षण उप समितीचा मी अध्यक्ष होतो. आता देखील उपसमितीचा अध्यक्ष आहे. मला वकिलाची गरज नाही. मात्र जरांगे पाटील यांनी त्यांचे तज्ञ वकील आणावेत. या सर्व विषयांवर योग्य मार्ग काढावा."

  • एकमेकांचा आदर करावा : "फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने कोणी कोणत्याही पक्षाचा असो त्याची कुठलीही विचारधारा असो मात्र त्याने एकमेकांचा आदर करावा, मैत्रीपूर्वक संबंध जपावे." असा संदेश चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

हेही वाचा

  1. "ठाकरे आणि पवारांचे विधान...: पाहा ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - Adv Prakash Ambedkar
  2. "मोदी जो निर्णय घेतील..."; मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट - Uddhav Thackeray Stance
  3. आरक्षणावरून महायुतीत विसंवाद; मुस्लिम आरक्षणाबाबत मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक, 'ही' केली मागणी - Abdul Sattar On Muslim Reservation

Last Updated : Aug 5, 2024, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.