ETV Bharat / state

चामुंडा स्फोट प्रकरण : आणखी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या आठ - Chamunda Blast Case

Chamunda Blast Case : नागपूर येथील चामुंडा या कंपनीत गुरुवारी स्फोट झाला. यात ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि तीन कामगार अत्यंत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामधील एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता मृतकांची संख्या आठ झाली आहे.

Chamunda Blast Case
चामुंडा कंपनी स्फोट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 11:29 AM IST

Updated : Jun 15, 2024, 6:36 PM IST

नागपूर Chamunda Blast Case: गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात असलेल्या धमणा येथील चामुंडा या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करत असलेल्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन कर्मचारी अत्यंत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यापैकी आणखी एका जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतकांची संख्या ही आठ झाली आहे. श्रद्धा पाटील, दानसा मरस्कोल्हे असं मृत्यू झालेल्या तरुणींचे नाव आहेत. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देत सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर मृतकांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख तर राज्य सरकारकडून १० लाख असे ३५ लाखांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले.

मृतकांमध्ये सहा महिलांचा समावेश: चामुंडा स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात ७ कामगारांनी आपला जीव गमावला. त्यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. प्रांजली मोदरे, वैशाली क्षीरसागर, प्राची फलके, शीतल चटप, मोनाली अलोने अशी मृत झालेल्या पाच महिलांची नावं आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व महिला या २० ते २५ वयोगटातील आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : "औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? हा प्रश्न चामुंडा दुर्घटनेमुळे निर्माण होत आहे. गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप कामगारांचा जीव गेला. डोंबिवली एमआयडीसीत दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येतात. सतत या घटना घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडं गांभीर्यानं लक्ष देत नाही. सतत होणारे हे अपघात मानवी चूक नसून पूर्णपणे सरकार आणि प्रशासनाची चूक आहे. यामध्ये सरकार दोषी आहे," असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा

  1. नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; पाच कामगारांचा होरपळून मृत्यू - NAGPUR Blast
  2. कुवेत आग दुर्घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह हवाई दलाच्या विशेष विमानानं भारताच्या दिशेनं रवाना - Kuwait Fire Tragedy

Last Updated : Jun 15, 2024, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.