ETV Bharat / state

मुंबईला पावसाचा तडाखा! ट्रॅकवर झाड कोसळल्यानं मध्य रेल्वेची सेवा साडेपाच तास विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा - Central Railway News

Central Railway : कल्याण-कसारादरम्यान ट्रॅकवर झाड पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक साडेपाच तास ठप्प झाली. रेल्वे सेवा पूर्ववत झाली असली तर मंदगतीनं रेल्वेची वाहतूक सुरू आहे. मुंबईसह उपनगरात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे.

Central Railway
Central Railway (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 1:57 PM IST

ठाणे Central Railway News : मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावर आटगाव - वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक वर झाड पडल्यानं मध्य रेल्वेची साडेपाच तास वाहतूक विस्कळीत झाली. तर याच मार्गावरील खडवली स्टेशनं दरम्यान रेल्वे ट्रॅक खालील असलेली खडी आणि माती वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामुळं कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या अप साईडच्या गाड्या पूर्णपणे विस्कळीत झाल्या. स्थानका दरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या राहिल्या होत्या. या घटनेमुळं प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेला पावसाचा फटका : समोर आलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायर तुटल्यानं आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळं लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईसह उपनगरात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना तसेच रुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू झाली आहे. त्यातच ओव्हरहेड वायर तुटल्यानं आसनगाव ते कसारा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळं लोकसेवा बंद करण्यात आल्या होत्या.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस : आज भल्यापहाटे कामावर निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम करण्यात आलं. शनिवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबईसह संपूर्ण परिसराला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलं असून नागरिकांना रस्त्यांमधून वाट काढावी लागत आहेत. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं लोकल सेवेलाही मोठा फटका बसला आहे. त्यातच झाडपडीच्या घटना घडल्यानं रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू झाली.

रेल्वे प्रशासनाकडून आवाहन : प्रवाशांनी संयम बाळगावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मात्र या घटनेचा मुबंई कल्याण मार्गावर परिणाम झाला नसून ही वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्याचबरोबर या मार्गावरील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली.

हेही वाचा

  1. राज्यातील महायुती सरकार अनिल अंबानींवर मेहरबान? - Mumbai Metro
  2. मरीन ड्राईव्ह परिसर पुन्हा चकाचक : आनंद महिंद्रांकडून पालिका कर्मचाऱ्यांचं कौतुक, टीम इंडियाच्या विजयी परेडनंतर 11 हजार किलोंचा कचरा साफ - Team India Victory Parade
  3. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन डबे सोडून गेलं पुढं - Panchavati Express

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.