पुणे Murlidhar Mohol : पुणे ड्रग्ज प्रकरणात विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत असून पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात आज शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्जच केंद्र बनलं आहे. नशेच्या आहारी एक पिढी जाताना दिसत आहे. सगळं ड्रग्ज हे गुजरातवरुन येत असल्याचं म्हटलं आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलय. कोणताही विषय मांडत असतात हातात पुरावा असला पाहिजे. उगाचच उठायचं आणि रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका करायची. व्यक्तिगत आकसापोटी टीका करणं योग्य नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं पण माझ्या शहराचं नाव खराब होईल असं वक्तव्य कोणीही करु नये, असं मोहोळ यांनी म्हटलंय. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच सुरू होणार : यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, "पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत काही निर्णय होते ते पूर्ण करण्यात यश आलय. पूर्वी प्रवासी त्रस्त होत होते. पण आता अनेक त्रुटींवर मार्ग काढत अपघातग्रस्त विमान संरक्षण विभागाच्या जागेत शिफ्ट करण्यात आलं आहे. शिफ्ट केल्यानं आता नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. तसंच धावपट्टी वाढविण्याबाबत विषय बराच पुढं गेला आहे. त्यासाठी विस्तारीकरण होणं गरजचं होतं. तसंच नवीन टर्मिनल बांधून झालं पण सुरू होत नव्हतं तेही आता सुरू होईल. सीएसआयएफचं मनुष्यबळ मिळत नव्हतं आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी ताबडतोब नवीन टर्मिनलसाठी सीआयएसएफ मनुष्यबळ दिलं आहे. पुढच्या काही दिवसांत पुण्यातील चांगल्या दर्जाचं बांधलेलं हे टर्मिनल सुरू होणार आहे."
पुण्याची बदनमी सहन करणार नाही : दिल्ली अपघाताबाबत मोहोळ म्हणाले, "दिल्ली अपघात दुर्घटना दुर्दैवी आहे. पाऊस होता त्यामुळं छत कोसळल्याचा अंदाज आहे. आम्ही काल भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं माहिती घेत होते. 20 लाख मदत जाहीर केली असून या अपघाताची माहिती डीजीसीआय अहवाल आल्यावर कळेल." तसंच पुण्याच्या दृष्टीनं ज्या घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत. मी सांगितल्याप्रमणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ प्रकरणामध्ये कोणालाही सोडू नका असे आदेश दिले आहेत. शहराचं नाव खराब होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकारण्यानं घ्यावी. या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून सगळे काम करु, कोणीही पुण्याचं नाव खराब होईल असं बोलू नका. कायदा सुव्यवस्था सगळी ठीक आहे. आम्हाला संपूर्ण शहरातून अमली पदार्थ काढून टाकायचे आहेत. त्यासाठी कोणीही उठून पुण्याची बदनामी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असंही यावेळी मोहोळ म्हणाले.
हेही वाचा :