मुंबई Ganpati Special Trains : गणेशोत्सवासाठी काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या साेयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं 202 गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गणपती विशेष गाड्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस (सीएसएमटी)-सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ करिता धावणार आहेत. या गणपती विशेष गाड्यांचं आरक्षण 21 जुलै 2024 पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं गणपती सणाकरिता काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल ट्रेन : रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01151 सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल ट्रेन 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही ट्रेन क्रमांक 01152 सावंतवाडी-सीएसएमटी दररोज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सावंतवाडी इथून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचणार आहे. या गाडीला दोन्ही दिशेने दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आरवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिला आहे.
सीएसएमटी-रत्नागिरी स्पेशल ट्रेन : ट्रेन क्रमांक 01153 सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी गणपती स्पेशल ट्रेन 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी साडे अकरा वाजता सीएसएमटी इथून निघून त्याच दिवशी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही ट्रेन क्रमांक 01154 गणपती स्पेशल ट्रेन 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे 4 वाजता रत्नागिरी स्थानकातून सुटून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकांवर पोहचणार आहे. या गाडीला दोन्ही दिशेने दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर या स्थानकांवर थांबा दिला आहे.
एलटीटी-कुडाळ स्पेशल ट्रेन : ट्रेन क्रमांक 01167 मुंबई लोकमान्य टिळक टर्मीनस (एलटीटी)-कुडाळ स्पेशल ट्रेन 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री 9 वाजता एलटीटी स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता कुडाळ येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबा दिला आहे.
21 जुलैपासून सुरु होणार आरक्षण : तसंच 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान एलटीटी-सावंतवाडी स्पेशल ट्रेन दररोज सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री 9 वाजता सावंतवाडी इथं पोहोचणार आहे. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकात थांबा दिला आहे. सोबतच ट्रेन क्रमांक 01155-56 दिवा ते चिपळूण मेमू, ट्रेन क्रमांक 01185-86 एलटीटी ते कुडाळा, ट्रेन क्रमांक 01165-66 एलटीटी ते कु़डाळ स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. या 202 गणपती विशेष गाड्यांचं आरक्षण 21 जुलै 2024 पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.
हेही वाचा :