ETV Bharat / state

'नीरी'त सीबीआयचा छापा, माजी संचालकांच्या गैरकारभाराची चौकशी; संचालकासह 10 जणांवर गुन्हे दाखल - CBI raid NEERI - CBI RAID NEERI

CBI raid On NEERI : आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या 'नीरी' (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत)च्या आवारात सीबीआयच्या पथकानं बुधवारी छापा टाकला. नीरीचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीबीआय पथक चौकशी करत असून त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

CBI raid NEERI
'नीरी'त सीबीआयचा छापा (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 10:21 PM IST

नागपूर CBI raid On NEERI : सीबीआयच्या पथकानं आज 'नीरी' म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (National Environmental Engineering Research Institute) छापा टाकला. सकाळी आकराच्या सुमारास सीबीआयचं एक विशेष पथक नीरीमध्ये दाखल झालं. त्यांनी काही कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. बनावट कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निधीचा अपहार झाल्याच्या अनुषंगानं काही तक्रारी सीबीआयकडं आल्या होत्या. त्या आधारेचं आज सीबीआयच्या पथकानं चौकशी सुरू केली असल्याची माहिती पुढं आली आहे. खासगी कंपन्यांना निरीनं अनुकूल अहवाल दिल्याची तक्रार सीबीआयला मिळाली होती. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी सीबीआय पथकानं आज 'नीरी'मध्ये चौकशी केली.

'नीरी'त सीबीआयचा छापा (ETV BHARAT Reporter)

तत्कालीन संचालकासह 10 जणांवर गुन्हे दाखल : सीबीआयनं आज राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्थामध्ये केलेल्या कारवाई प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्यामध्ये एकूण 10 जणांना आरोपी केलं आहे.आरोपींमध्ये नीरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार यांच्यासह चार शास्त्रज्ञ, पाच खासगी कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वांवर निरीच्या वेगवेगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात सीबीआयला काही तक्रारी मिळाल्या होत्या. त्या आधारावर सीबीआयनं नागपूर महाराष्ट्रसह देशातील वेगवेगळ्या चार राज्यात एकूण 17 ठिकाणांवर छापे टाकले.

डॉ. राकेश कुमार दोन महिन्यांपूर्वी निलंबित : गैरव्यवहाराच्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नीरी'चे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांना या वर्षीच्या एप्रिल महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. डॉ. राकेश कुमार यांना सेवानिवृत्तीच्या तीन दिवस आधी निलंबित करण्यात आलं होतं.

'नीरी'त सीबीआयचं पथक : पर्यावरण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण यासारख्या अतिमहत्वाच्या विषयांवर संशोधनात्मक अभ्यास करून त्यावर उपाय सुचवणारी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणून 'नीरी' कार्यरत आहे. निरी संस्था केंद्र सरकारच्या वैज्ञानिक, औद्योगिक अनुसंधान परिषद म्हणजे सीएसआर अंतर्गत काम करणारी नामांकित संशोधन संस्था आहे. सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या नामांकित संशोधन संस्थेत सीबीआयचं पथक चौकशीसाठी आल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.