मुंबई The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रुथ' या वेब सिरीजचं फर्स्ट लूक पोस्टर 29 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आलं. त्यानंतर आता या प्रकरणावरुन नव्या वादाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. या वेब सिरीज विरोधात नुकताच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने मुंबई सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. तसंच 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रुथ' या वेब सिरीजवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या अर्जातून करण्यात आली होती.
- आज (17 फेब्रुवारी) मुंबई सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणासंबंधी 20 फेब्रुवारी पर्यंत उत्तर दाखल करण्यात यावं, अशी नोटीस नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्विसेज इंडियाला बजावण्यात आली आहे.
नेटफ्लिक्सला नोटीस : सीबीआयच्या वतीनं सरकारी वकील सी. जे. नांदोडे यांनी सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जात म्हंटलंय की, "'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रुथ' या वेब सिरीजमध्ये शीना बोरा हत्याकांडातील आरोपीशी संबंधित लोकांना दाखवण्यात आलंय. त्यामुळं या वेब सिरीजचे 23 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर होणारे प्रसारण रोखण्यात यावे." यासंबंधीत पार पडलेल्या सुनावणीत सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस पी नाईक निंबाळकर यांनी नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्विसेज इंडियाला 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत उत्तर दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण? : इंद्राणी मुखर्जी ही एका माध्यम कंपनीची सीईओ होती. 2012 मध्ये 24 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शीनाची आई इंद्राणी मुखर्जीनं हा कट रचल्या आरोप आहे. शीनाचे सावत्र वडील पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या आणि कट रचल्याचा आरोप याआधी करण्यात आला होता. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी तिचा ड्रायव्हर श्याम आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नाला अटक करण्यात आली होती. 20 मे 2022 रोजी 2 लाख रुपये दिल्यानंतर मुक्त झालेल्या इंद्राणीनं दावा केला की तिची मुलगी जिवंत आहे. ती तिचा शोध घेईल. इंद्राणी मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात 6 वर्षे 9 महिने राहिली होती.
हेही वाचा -