अहमदनगर Cauliflower Success Story : टोमॅटो, कोथंबीर पाठोपाठ आता फ्लॉवर कोबीलाही (Cauliflower) चांगला बाजार भाव मिळत असल्याचं पहिला मिळतंय. जिल्ह्यातील रत्नाकर पोखरकर (Ratnakar Pokharkar) या शेतकऱ्याचा फ्लॉवरला तब्बल 25 रुपय किलो भावा मिळाला असून थेट दिल्लीचा बाजारातून मागणी आल्यानं शेतकऱ्यानं आनंद व्यक्त केलाय.
बाजारात फ्लॉवर-कोबीला चांगला भाव : फ्लॉवर पिकाचे योग्य नियोजन केल्यानं शेतकऱ्यांना फायदा होतो. एरवी फ्लॉवर आणि कोबी यांचे बाजार गडगडल्यानं शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. मात्र सध्या फ्लॉवर-कोबीला चांगला भाव मिळत आहे. यामुळं शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. संगमनेर तालुक्यातील रत्नाकर पोखरकर शेतकरी फ्लॉवर पिकामुळं मालामाल झाले आहेत.
बावीस ते पंचवीस रुपये भाव : एरवी केवळ तीन ते चार रुपये किलो प्रमाणे बाजार भाव मिळाल्यानं यातून नुसता काढणीसाठी खर्च निघत होता. यामुळं जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, भागातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवल्याचंही पाहाला मिळाले. मात्र, यावर्षी चित्र काहीस वेगळ दिसून येतय. सध्या बाजारात सर्वच पिकांना चांगला बाजारभाव मिळतोय. त्यात सध्या काढणीला आलेल्या फ्लॉवर पिकाला काढणीसह वीस ते पंचवीस रुपये भाव मिळतोय. त्यामुळं संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात फ्लॉवर पिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचं शेतकरी रत्नाकर पोखरकर यांनी "ई टीव्ही भारतशी" बोलतांना सांगितलं.
थेट दिल्लीतून मागणी : तीन एकर क्षेत्रात 60 हजार फ्लॉवरची रोपांची चार बाय एकवर लागवड केलीय. 40-45 दिवसांमध्ये फ्लॉवर काढण्यासाठी आले. फ्लॉवर शेती उभी करण्यापासून आतापर्यंत खुरपणी, कीटकनाशके, खते इत्यादींसाठी तब्बल दोन लाख रुपये खर्च आलाय. यंदाचा वर्षी फ्लॉवरला थेट दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून मागणी आली असून तब्बल 25 रुपये किलो भाव मिळाला आहे. यंदाचा वर्षी चांगला भाव मिळाल्यानं सगळा खर्च वजा करता तब्बल 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याचं शेतकरी रत्नाकर पोखरकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming
- कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming
- महाराष्ट्राचं कलिंगड पोहचलं थेट पश्चिम बंगालला; अहमदनगरच्या युवा शेतकऱ्याची कमाल - Watermelon Success Story