ETV Bharat / state

निवडणुकीच्या निकालावर चक्क बुलेटची लावली पैज, 'तो' कागद सोशल मीडियावर व्हायरल, दोन मित्रांवर गुन्हा - Gambling On Election Result

Gambling On Election Result : सांगली लोकसभा मतदार संघातून कोणता उमेदवार निवडणुकीत विजयी होणार, यावर पैज लावणं दोन मित्रांच्या चांगलच अंगलट आलं. याप्रकरणी रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमन कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या पैजेचा कागद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.

Gambling On Election Result
जप्त केलेल्या दुचाकी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 4:46 PM IST

दुचाकी जप्त करायला गेलेली पोलिसांची चमू (Reporter)

सांगली Gambling On Election Result : लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावरुन बुलेट गाडीची लावलेली पैज दोघा मित्रांच्या चांगलीच अंगलट आली. पैज लावणाऱ्या दोघांवर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असं गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. पैजेत लावलेल्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पैजेचा कागद सोशल मीडियावर व्हायरल : सांगलीचा खासदार कोण होणार यावरुन कवठे महांकाळ तालुक्यातील दोघा मित्रांमध्ये एकमेकांच्या गाड्यांची पैज लागली आहे. एकानं अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर आपली युनिकॉर्न गाडी आणि दुसऱ्यानं भाजपा उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले, तर आपली बुलेट गाडी देईन, अशी पैज लावली आहे. रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावणाऱ्या मित्रांची नावं आहेत. तर दोघांनी लावलेली पैज कागदावर लिहून घेतली आणि या पैजेचा कागद सांगलीच्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्यामध्ये विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना तर संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचं नाव आणि स्वाक्षरी देखील घेण्यात आली.

बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या जप्त : रमेश जाधव आणि गौस मुलाणी या दोघांनी लावलेली या पैजेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्याचबरोबर माध्यमांमध्ये देखील या दोघांच्या पैजेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर कवठे महांकाळ पोलिसांनी या पैजेची गंभीर दखल घेत या दोघांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियमन कायद्यांतर्गत कारवाई केली. पोलिसांनी रमेश जाधव आणि गौस या मुलांवर गुन्हे दाखल करत त्यांच्याकडील असणारी बुलेट आणि युनिकॉर्न गाड्या जप्त केल्या. त्यामुळे पैज लावून पैजेचा कागद सोशल मीडियावर व्हायरल करणं, या दोघांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

हेही वाचा :

  1. राज्यातील मतदानाचा टक्का घसरला, जॅकी भगनानीनं जनतेला 'हे' केलं आवाहन - Lok Sabha Elections 2024
  2. भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident
  3. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.