ETV Bharat / state

घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पाईपने मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा दाखल - मुलीला पाईपने मारहाण

Brutal Beating : ठाणे येथील शिक्षिकेने घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Thane Crime News
मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 12:10 PM IST

ठाणे Brutal Beating : घरात कामासाठी आणि मुलाला सांभाळण्यासाठी दिल्ली येथून आणलेल्या ११ वर्षीय मुलीला पाईपनं मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय शिक्षिका पूजा आशिष यादव यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawadi Police Station) बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आधिक तपास कापूरबावडी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत.

मुलीला पाईपने मारहाण : शिक्षिका पूजा आशिष यादव यांनी ओळखीच्या ११ वर्षीय मुलीला घर आणि मुलाला सांभाळण्यासाठी दिल्ली येथून ठाण्यात आणलं होतं. अल्पवयीन मुलीकडून शिक्षिका काम करून घेत होती. तर दुसरीकडं मुलाला सांभाळत नाही, म्हणून पाईपनं मारहाण करून तिला घरातच उपाशी कोंडून ठेवलं होतं.अखेर मुलीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती, डीसीपी अमर सिंह जाधव यांनी दिलीय.

पीडित मुलीची केली वैद्यकीय तपासणी : पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तसंच तिचे पालक दिल्ली येथे असल्यानं प्रथम बाल कामगार विरोधी पथकाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मारहाण करून अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न : ठाणे शहरात विविध गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या आधीही भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील एका ३२ वर्षीय आरोपीने शेजारील ३ वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली होती. शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना 17 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठाण्यात घडली होती. या घटनामुळं स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर काही पालकवर्ग या घटनेमुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षे बाबत चिंता व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -

  1. भररस्त्यात चाकूनं हल्ला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील घटनेनं ठाण्यात खळबळ
  2. ब्युटी पार्लरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय; दोन पीडित महिलांची सुटका, पार्लरची मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात
  3. अधिकाऱ्याच्या पोराचा प्रताप; किरकोळ वादातून प्रेयसीला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न, पीडिता गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.