मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज अंतिम करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ 203 उमेदवार आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात उरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे.
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार? : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पात्र उमेदवार पंचवीस होते. त्यामधील चार उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 21 उमेदवार रिंगणात आहेत. अकोला मतदार संघामध्ये पात्र उमेदवार सतरा होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता पंधरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये 56 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 36 उमेदवारांमध्ये लढत होणार आहेत. (Lok Sabha Candidates) वर्धा लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार होते, त्यापैकी 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 24 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
34 उमेदवारांमध्ये लढत : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली मतदार संघात 48 उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी 15 -उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 33 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात 66 उमेदवार पात्र ठरले त्यापैकी तब्बल 43 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता फक्त 23 उमेदवार रिंगणात आहेत. परभणी 41 लोकसभा मतदारसंघात उमेदवार पात्र झाले होते त्यापैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता 34 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठक घेतल्याची तक्रार निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारी संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खुलासा करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित बाबतीत गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भातील अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती एस.चौकलिंगम यांनी दिली आहे.
आचार संहिता कायद्याअंतर्गत कारवाई : आचारसंहिता कायद्यांतर्गत राज्यात 38 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर, 24 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे 207 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, 55 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आल्याची माहिती चोकलिंगम यांनी दिली आहे.
हेही वाचा :