मुंबई Bobby Deol Cancer Awareness : देशात मागील काही वर्षांपासून कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. कॅन्सर हा खूप गंभीर आणि घातक रोग आहे. (Nanavati Max Hospital) कॅन्सरवर वेळीच उपचार झाले नाहीत तर, रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कॅन्सरबाबत देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तरीसुद्धा कॅन्सरमुळं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. दरम्यान, कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आज मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स रुग्णालयतर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता बॉबी कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सहभागी झाला होता.
200 बाईकर्संनी काढली रॅली: कॅन्सरच्या जनजागृतीसाठी देशभरात अनेक संस्था, संघटना काम करत असतात. तसेच कॅन्सर हा घातक आणि जीवघेणा आजार असल्यामुळं ज्यामुळे कॅन्सर होतो त्याचं सेवन करणं टाळा, असा संदेश अनेक सामाजिक संघटना, संस्था देत असतात. दरम्यान, आज नानावटी मॅक्स रुग्णालयातर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोनशे पेक्षाअधिक बाईकर्संनी विलेपार्ले नानावटी मॅक्स रुग्णालय ते बँन्ड स्टँड इथपर्यंत बाईक रॅली काढली. यावेळी बाईकर्सनी कॅन्सरबाबत जनजागृती करणारे फलक बाईकवर घेतले होते. त्याआधी अभिनेता बॉबी देओल यानं झेंडा फडकवून बाईकर्सना हिरवा कंदील दाखवला.
कॅन्सरला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र या: या कार्यक्रमात बॉबी देओल आल्यानंतर बाईकर्संनी तसेच चाहत्यांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. यावेळी बोलताना बॉबी देओल म्हणाला की, कॅन्सर हा घातक आणि जीवघेणा आजार आहे. या आजारावर मात करण्यासाठी समाजात जनजागृतीची सध्या गरज आहे. या भयंकर रोगावर आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनसुद्धा त्यानं केलं. कॅन्सर होण्यास कारणीभूत आहेत असे तंबाखू, सिगारेट आणि गुटखा यांचं सेवन टाळलं पाहिजे, असंही यावेळी नानावटी मॅक्स रुग्णालयाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अभय सोई यांनी म्हटलं.
बाईक रॅलीत महिलांचाही सहभाग: या कार्यक्रमाच्या वेळी रुग्णालय परिसरात कॅन्सरवर कशाप्रकारे मात करायची, हे संदेश देणारे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले होते. कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. तसेच बाईक रॅलीसाठी मुंबईसह मुंबई बाहेरील देखील बाईकर्सनी या रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी बाईक रॅलीत पुरुषांप्रमाणे महिलांही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा: