सातारा Canal Burst In Vai : जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी परिसरात काल (3 फेब्रुवारी) रात्री फुटल्यानं हजारो लिटर पाणी ओढ्यातून वाहून गेलं आहे. सुदैवाने या घटनेत शेतीची हानी झालेली नाही. (Canal in Vayazwadi area) सध्या धरणातून कालव्यास पाणी सोडणे थांबविण्यात आलं आहे.
यापूर्वीही कालवा फुटल्याची घटना: वाई तालुक्यातील धोम धरणाचा उजवा कालवा फुटल्यानं हजारो लिटर पाणी ओढ्यातून वाहून गेलं आहे. साताऱ्यातील व्याजवाडी परिसरात ही घटना घडली. कालव्याला पडलेल्या भगदडातून वाहून जाणारे पाणी ओढ्यात गेल्यामुळं शेतीचं नुकसान टळलं. दरम्यान, एक महिन्यापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास याच धरणाचा डावा कालवा फुटल्यानं हाहाकार माजला होता.
महिनाभरातच उजवा कालवा फुटला: साताऱ्यातील व्याजवाडी परिसरात धोमचा धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आहे. डावा कालवा फुटलेल्या घटनेला महिना होतोय. तोवर उजवा कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाणी ओढ्यातून वाहून गेल्यानं शेतीचं नुकसान टळलं. मात्र लाखो लिटर पाणी वाया गेलं. यामुळे पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कालव्यांच्या सर्वेक्षणावरदेखील संशय व्यक्त केला आहे.
उजव्या कालव्याला पाणी सोडणं थांबवलं: कालवा फुटल्यानं धोम धरणातून कालव्यास पाणी सोडणं थांबविण्यात आलं आहे. दरम्यान, कालवा फुटल्याची माहिती मिळताच व्याजवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. काही वेळात पाटबंधारे आणि अन्य प्रशासनाचे अधिकारी आणि किसन वीर कारखान्याचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
महिनाभरापूर्वीच फुटला होता डावा कालवा: साताऱ्यातील धोम धरणाचा डावा कालवा डिसेंबर २०२३ मध्ये पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री फुटला होता. त्यावेळी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात कालव्याचं पाणी शिरलं होतं. या घटनेत ओढ्याकाठच्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या, जनावरे पाण्यातून वाहून गेली होती. सुदैवाने १४ बैलांना वाचवण्यात यश आलं होतं; मात्र ऊसतोड मजुरांचे संसार उघड्यावर आले होते.
हेही वाचा: