मुबई Mumbai High Court : एखाद्याला बांगलादेशी, रोहिंग्यांना जिहादी म्हणून संबोधणं हे भारतातील मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. भाजपा आमदार नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्या वक्तव्याबाबत पोलिसांनी न्यायालयाला ही माहिती दिली. रोहिंग्या, बांगलादेशींना जिहादी म्हणणे भारतातील मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणे आहे. त्यामुळं भाजपा आमदार नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांना मोठा दिलासा दिला आहे.
..त्यांची वक्तव्य मुस्लिमविरोधी नाही : मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकणी नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. घाटकोपर, मानखुर्द, मालवणी, काशीमीरा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत या भाजपा नेत्यांनी मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकली होती. मात्र, त्यांच्या भाषणात मुस्लिम समाजाविरोधात कोणतंही वक्तव्य नव्हतं. बांगलादेशी, रोहिंग्याविरोधात त्यांनी भाषण केलं, असा दावा मुंबई पोलिसांतर्फे न्यायालयात करण्यात आला.
विविध ठिकाणी गुन्हा दाखल : नितेश राणे यांनी घाटकोपर, मालवणी, काशिमीरात केलेल्या भाषणात रोहिंग्या, बांगलादेशी, जिहाद बाबत अपशब्द वापरले होते. काशिमीरा येथील कार्यक्रमात टी. राजा. गीता जैन यांनी त्यांच्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र, रोहिंग्या, बांगलादेशी असे शब्द वापरल्यानं कलम 295 ए लावता येणार नाही, असा युक्तिवाद वेळी सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयासमोर केला. मानखुर्द पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये 295 ए कलम लावण्यात आलं आहे. तिथं मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. तर, घाटकोपर येथील प्रकरणात राणे, सुभाष अहिरविरोधात 153 ए, 153 बी, 504, 506 या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मालवणी येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भा.दं.वि.च्या कलम 153 ए, 504, 506, 188 कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर, काशिमीरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविच्या कलम 143, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याप्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आल्याची माहिती वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली.
हे वाचलंत का :
- वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case
- मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस; ब्रिटीशकालीन पाऊलखुणा पूसणार - Mumbai Railway Stations Rename
- केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा; विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला 'हा' निर्णय - ECI on NCP SCP