ETV Bharat / state

आईला कॅन्सर झाल्यानं रचला कट, 'डीपी'वर प्रफुल्ल पटेल यांचा फोटो ठेवत आर्थिक फसवणूक करण्याचा होता डाव, पण... - Businessman From Juhu Arrested - BUSINESSMAN FROM JUHU ARRESTED

Businessman From Juhu Arrested : आईला कॅन्सरनं घेरल्यामुळं त्याला तिच्या उपचारासाठी पैशाची गरज भासली. यासाठी संबंधित आरोपीनं राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या व्हाट्सअपला प्रोफाइल फोटो वापरून व्हॉटस अप अकाउंट तयार केलं. यानंतर त्याने एका धनाड्य कुटुंबाकडे पैशाची मागणी केली; मात्र त्या कुटुंबाला समोरील व्यक्तीवर संशय आला आणि त्यांनी पटेल यांनी ही माहिती कळविली. महाराष्ट्र सायबर विभागाला याबाबत तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेचा तपास करून संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वाचा सविस्तर प्रकरण...

Businessman From Juhu Arrested
फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 9:07 PM IST

Updated : Jul 26, 2024, 10:59 PM IST

मुंबई Businessman From Juhu Arrested : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोचा गैरवापर करत एका अज्ञात इसमाने व्हाट्सअपला प्रोफाइल फोटो म्हणून वापरला आणि स्वतः प्रफुल्ल पटेल असल्याचं भासवल्या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाला तक्रार प्राप्त झाली. या आधारे नोडल सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे. या प्रकरणी जुहूच्या व्यावसायिकाला ताब्यात घेतलं आहे.

डीपीवर प्रफुल्ल पटेल यांच्या फोटो प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी (Etv Bharat Reporter)

राजघराण्याची फसवणूक करण्याचा होता बेत : या प्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाण्यात कलम ६६ (८) माहिती ज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला गेला असून राहुल कांत नावाच्या जुहूच्या व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचं बनावट व्हॉट्सॲप खातं उघडून फसवणुकीचा प्रकार महाराष्ट्र सायबरने उधळला आहे. कतार मधील राजघराण्यातील लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत हा आरोपी होता. प्रफुल्ल पटेल यांच्याकडून तक्रार येताच महाराष्ट्र सायबरने चौकशी आणि तपास सुरू केला. अप्लिकेशनच्या मदतीनं प्रफुल्ल पटेल असल्याचा बनाव आरोपीनं केला होता. नंतर व्हॉट्सॲप खातं डिलिट करण्यात आलं होतं. रॉयल फॅमिलीने प्रफुल्ल पटेल यांना माहिती दिली होती. आईला कॅन्सर असल्यानं राहुल कांतला पैशाची गरज असल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. तसेच हॉटेल व्यवसायात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावानं कतारच्या रॉयल फॅमिलीला गंडा घालण्याचा कट रचला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

प्रफुल पटेलांच्या फोटोचा गैरवापर : 20 जुलै रोजी महाराष्ट्र सायबर विभागाकडे अज्ञात व्हॉट्सॲप अकाउंट धारकाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील तक्रारदार विवेक अग्निहोत्री यांनी समक्ष नोडल सायबर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. २० जुलै रोजी फिर्यादी यांना त्यांच्या कार्यकर्त्याकडून कळालं की, अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने प्रफुल्ल पटेल यांचा फोटो आणि त्यांचं नाव वापरून व्हॉट्स ॲप सोशल मीडियावर तो स्वतः प्रफुल्ल पटेल (राज्यमभा सदस्य) असल्याचं भासवत तसेच त्याचा चुकीचा वापर करत असल्याचं कळलं. त्यानंतर फिर्यादी यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही माहिती सांगितली.

खासदाराच्या नावाचा आणि फोटोचाही गैरवापर : फिर्यादी यांनी अज्ञात मोबाईल धारकाचा मोबाईल क्रमांक ट्रू कॉलरवर तपासाला असता त्या मोबाईल क्रमांकाचे डिस्प्ले प्रोफाईल Praful Patel असं दिसून आलं. त्यानंतर हा क्रमांक व्हॉट्स ॲपवर चेक केला असता त्याचं डिस्प्ले प्रोफाईल Praful Patel असं नाव आणि प्रफुल्ल पटेल यांचा फोटो दिसून आला. त्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ त्याचे स्क्रिन शॉट काढले. त्यामुळे त्यांची खात्री झाली की, अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून खोटे व्हॉट्सॲप अकांऊट तयार केले आहे. त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र सायबर विभागाने अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे जोरदार फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा:

  1. सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
  2. सायबर गुन्हे करण्याकरिता कर्मचाऱ्यांना पगारी ठेवून साडेचार कोटींची फसवणूक, देशाच्या सिलिकॉन व्हॅलीतील धक्कादायक घटना - cyber crime
  3. Cyber Menace डिजिटल फसवणूक; एक चिंताजनक सायबर धोका

Last Updated : Jul 26, 2024, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.