ETV Bharat / state

दुहेरी हत्याकांड! पैशाच्या वादावरुन दिरानं केला भावजयींचा खून, अहिल्यानगरमध्ये खळबळ - DOUBLE MURDER IN AHILYANAGAR

दशक्रिया विधीचे पैसे दिले नाही म्हणून एका दिरानं आपल्याच दोन भावजयींची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे.

brother in law killed two sister in law over money issue in Ahilyanagar
अहिल्यानगर दुहेरी हत्याकांड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2024, 11:10 AM IST

अहिल्यानगर : अहिल्यानगरचा अकोले तालुका दुहेरी हत्याकांडानं हादरलाय. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिरानेच त्याच्या दोन भावजयींची कोयत्यानं सपासप वार करुन हत्या केली. हत्येनंतर दीर घटनास्थळावरुन फरार झाला असून आरोपी दिराचं नाव दत्तात्रय प्रकाश फापाळे आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. तसंच, पोलिसांनी नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं असून आरोपी माथेफिरु असल्याचं सांगितलं जातंय.

हत्येचं कारण काय? : जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिरानं दोन भावजयांचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी घडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. भरवस्तीत दिवसाढवळ्या हा हत्येचा थरार घडला. दोन्ही महिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळले होते. उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे अशी दोन्ही मृत महिलांची नावं आहेत. आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यांसमोरच ही धक्कादायक घटना घडली असून त्यांनीच पोलिसांनी घडलेला प्रकार सांगितला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हत्या केल्यानंतर हातात कोयता घेऊन रस्त्यानं जात असल्याचं बघायला मिळतंय.

गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर घटनेचा पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आलीय.

हेही वाचा -

  1. पाय घसरुन पतीचा मृत्यू झाल्याचा पत्नीकडून बनाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
  2. चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करून 15 लाखांचे दागिने लंपास, धाकट्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात - Kolhapur Crime
  3. मामे बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधावरून तिघांनी केली तरुणाची हत्या, आरोपी अटकेत - Nagpur Murder News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.