ETV Bharat / state

मुसळधार पावसानं पूल गेला वाहून; बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प - Heavy Rain In Beed - HEAVY RAIN IN BEED

Heavy Rain In Beed : मुसळधार पावसानं बीड अहमदनगर महामार्गावरील पूल वाहून गेला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं हे काम सुरू आहे. मात्र या महामार्गावर आष्टी इथं केलेला तात्पुरता पूल वाहून गेला.

Heavy Rain In Beed
वाहून गेलेला पूल (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 12:17 PM IST

बीड Heavy Rain In Beed : आष्टी तालुक्यातील कडा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गांवरील तात्पुरता केलेला पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु आहे. कडा इथं कडी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरु होतं. या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळवण्यात आली. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानं कडी नदीला पूर आला. या पुराच्या जोरदार प्रवाहानं हा पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे.

Heavy Rain In Beed
मुसळधार पावसानं पूल गेला वाहून (Reporter)

मुसळधार पावसानं उडवली दाणादाण : बीड जिल्ह्यात आठ दिवसाच्या उघडीपीनंतर कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली, अशा रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच राज्य महामार्गावर चालू असलेली कामं धिम्या गतीनं चालू आहे. या मार्गावर करण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील पूल आणि कामाला पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे बीड अहमदनगर रस्त्यावरील कडा येथील कडी नदीवर असलेला पूल वाहून गेल्यानं नगरकडं जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. कंस्ट्रक्शन कंपनीनं गेली अनेक दिवसांपासून हे काम प्रलंबित ठेवलं, असा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक वेळा त्यांना नोटीस देखील देण्यात आली. तरीही गुत्तेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी प्रयत्न : "आम्ही हे काम करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अहमदनगर ते आष्टीपर्यंतचा हा टप्पा आम्ही लवकरच पूर्णत्वाकडं नेत आहोत. मात्र काही अडचणींचा सामना आम्हाला करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी आम्ही एक साईट चालू केली आहे. तर दुसऱ्या साईटनं काम चालू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाह्यवळण रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. वाहतुकीची कोंडी झाली असून आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. दमदार पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हा पूल वाहून गेला आहे. काही दिवसातच आम्ही या पुलाचं काम लवकरच पूर्ण करू" अशी माहिती कंस्ट्रक्शन कंपनीच्या वतीनं देण्यात आली.

हेही वाचा :

  1. शहापूर आणि मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस; वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली, 18 गावपाड्यांचा संपर्क तुटला - Heavy rain in Thane district
  2. जगण्याची वाट बिकट! जीवावर उदार होऊन महिलांसह विद्यार्थ्यांना करावा लागतो नदीतून प्रवास - FLOOD IN BORVAN RIVER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.