मुंबई Bombay High Court Orders : आयआयटी मुंबई येथील अभियांत्रिकी शिक्षण घेणारा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येस आरोपी अरमान खत्री जबाबदार असल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र, अरमान खत्री यानं जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्याबाबत सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाचे न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात नमूद केलंय की, "आरोपीचा केवळ नावाचा उल्लेख आहे. आरोपीनं कोणतं कृत्य केलं याचा कुठलाही त्याच्यात पुरावा नाही. त्यामुळंच आरोपी अरमान खत्रीचा जामीन मंजूर करण्यात येतंय. विशेष न्यायालयानं नुकताच हा जामीन मंजूर केलाय.
जामिनासाठी विशेष न्यायालयात केला अर्ज : मुंबईच्या आयआयटी पवई इथं मागच्या वर्षी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी दर्शन सोळंकी यांनं आत्महत्या केल्याचं प्रकरण घडलंय. आत्महत्येच्या पूर्वीच्या चिठ्ठीत अरमान खत्री याचं नाव आहे. त्यामुळं तो या कृत्यात जबाबदार असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. परंतु, अरमान खत्रीला आरोप अमान्य होता. त्यामुळं त्यानं विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली असता न्यायालयानं, "अरमान खत्रीच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या कोणत्याही कृती किंवा घटनेचा संदर्भात त्यात नाही. त्यामुळंच निव्वळ तो आरोप आहे. तो म्हणजे पुरावा होऊ शकत नाही", असं म्हणत अरमान खत्रीला जामीन मंजूर केलाय.
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत आरोपीच्या नावाशिवाय दुसरं काही नाही : अरमान खत्रीच्या वतीनं त्याच्या वकिलांनी मुद्दा उपस्थित केला की, "अरमान खत्री आणि दर्शन सोळंकी यांच्यात केवळ महाविद्यालयातील काळात जसं भांडण होतं, त्याप्रकारचं भांडण झालं होतं. अरमान खत्रीनं दर्शन सोळंकीला पेपर कटरनं धमकावलं होतं. म्हणून त्यानंतर आत्महत्येच्यापूर्वीच्या चिठ्ठीत त्याचं नाव आलं. परंतु, या पलीकडे चिठ्ठीत कुठलाही आरोप नाही. तसंच मृत दर्शन सोळंकीच्या नातेवाईकांकडून आरोपीच्या विरुद्ध कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळंच अरमान खत्रीबाबत केलेल्या आरोपांवर शंका निर्माण होते. त्यात अधिक तथ्य नाही."
जामीन मिळाल्यास आरोपी तपासावर प्रभाव टाकेल : जामिनाला विरोध करताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, "दर्शन सोळंकी या आयआयटी मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी तपास यंत्रणा तपास करत आहेत. परंतु, तपास करत असताना जर आरोपीला जामीन मिळाला, तर फिर्यादी साक्षीदारांवर दबाव किंवा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याला जामीन देऊ नये."
आरोपीला जामिन मंजूर : दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीशांनी निर्णय दिला की, "आत्महत्येच्या पूर्वीच्या चिठ्ठीत मयताकडून केवळ आरोपीबाबत नावाचा उल्लेख झाला. परंतु, त्या प्रकारचं कोणतंही कृत्य, घटना किंवा संदर्भ याचा कुठंही घडल्याचा त्यात पुरावा नाही, तसा उल्लेख नाही. त्यामुळंच आरोपीस जामीन मंजूर करण्यात येत आहे."
हेही वाचा :