ETV Bharat / state

न्यायालयानं दोषी ठरवल्याची माहिती लपवली; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना उच्च न्यायालयाचं समन्स, राजन विचारेंनी दाखल केली याचिका - High Court Summons to Naresh Mhaske

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 7:19 AM IST

High Court Summons to Naresh Mhaske : ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. या प्रकरणी राजन विचारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवर खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे.

High Court Summons to Naresh Mhaske
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई High Court Summons to Naresh Mhaske : या मतदारसंघातील शिवसेना उबाठा पक्षाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रियाज छागला यांनी खासदार नरेश मस्के यांना समन्स बजावलं आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. नरेश मस्के यांना कनिष्ठ न्यायालयानं एका प्रकरणात दोषी ठरवल्याची बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रकात लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात 4 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

न्यायालयानं दोषी ठरवल्याची माहिती लपवली : राजन विचारे यांनी त्यांचे वकील दरियस खंबाटा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करुन राजन विचारे यांना विजय घोषित करावं, अशी मागणी केली आहे. नरेश म्हस्के यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात त्यांच्याविरुद्ध कुठल्याही गुन्हामध्ये शिक्षा झाली नसल्याचं नमूद केलं आहे. मात्र त्यांना एका खटल्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं त्यांची अपील याचिका देखील फेटाळली. ही बाब नरेश मस्के यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लपवली, असा आरोप राजन विचारे यांच्यातर्फे करण्यात आला आहे.

नरेश मस्के यांनी केला राजन विचारेंचा पराभव : ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांना 5 लाख 17 हजार 220 मतं मिळाली. तर विजयी उमेदवार नरेश म्हस्के यांना 7 लाख 34 हजार 231 मतं मिळाली. नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा 2 लाख 17 हजार 11 मतांनी पराभव केला. ही याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी राजन विचारे यांनी पूर्ण केल्या असून 45 दिवसांच्या आत त्यांची याचिका दाखल करण्यात आली. इतर बाबींची पूर्तता केली असल्याचं खंबाटा यांनी न्यायालयात सांगितलं. सहा महिन्याच्या आत सुनावणी होणं आवश्यक असल्यानं न्यायालयाने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर न्यायमूर्तींनी नरेश म्हस्के यांना समन्स बजावून पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

हेही वाचा :

  1. Rajan Salvi : "माझ्या कुटुंबियांना...", एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवी यांची प्रतिक्रिया
  2. आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अन् मुलाला दिलासा, 21 फेब्रुवारी पर्यंत कारवाई नाही
  3. नारायण राणेंना मानाची पदं शिवसेनेमुळंच मिळाली, विसर पडू नये- राजन साळवी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.