ETV Bharat / state

अर्धनग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय - Woman Body Found Palghar

Woman Body Found Palghar : पालघर-मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. यावेळी महिलेचं डोकं दगडानं ठेचल्याचं दिसून आलं. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 6:18 PM IST

Updated : Jul 6, 2024, 6:44 PM IST

Body found unidentified woman
पंचनामा करताना पोलीस (Etv Bharat Reporter)

पालघर Woman Body Found Palghar : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत महिलेची ओळख पटली नसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली.

नीता पाडवी यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

"मृत महिलेचं डोकं दगडानं ठेचून हत्या केली. तसंच महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. याप्रकरणी मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत". - नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी

महिलेचं डोकं दगडानं ठेचलं : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ गॅरेजच्या मागील बाजूस शुक्रवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी, मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला असून, मृतदेहाचं वय अंदाजे 35 ते 40 दरम्यान आहे. मृत महिलेचं डोकं दगडानं ठेचलेलं असून कमरेखालील भाग नग्न असल्याचं आढळून आलं.

घातपाताचा संशय : पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. महिलेच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलीस मुख्यालयाच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. घटनास्थळाच्या तपासात मृत महिलेचा स्कार्फ, छत्री आणि चप्पला पोलिसांना सापडल्या असून या सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

'हे' वाचलंत का :

  1. भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News
  2. मॅट्रिमोनी ॲपवर विश्वास ठेवत असाल तर सावधान! भामट्याने लग्नाचं आमिष दाखवून घातला ६० लाखांचा गंडा - Thane Crime News
  3. भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला;महिला कॉन्सटेबलसह ३ पोलीस जखमी

Last Updated : Jul 6, 2024, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.