ETV Bharat / state

अंध असूनही बनले हरहुन्नरी कलाकार; रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी - Nandkishor Ghule Success Story - NANDKISHOR GHULE SUCCESS STORY

Nandkishor Ghule Success Story : ग्रामीण भागात अनेक कलाकार दडले आहेत. त्या कलाकारांची महाराष्ट्राला ओळख झालेली नाही. असेच एक वयाच्या साठीतील कलाकार अहमदनगर जिल्ह्यातील सावरगाव घुले (Sawargaon Ghule Village) या छोट्याश्या गावात आहेत. या कलाकाराची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊ.

Blind Nandkishor Ghule
नंदकिशोर बाळाजी घुले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:30 AM IST

Updated : Mar 26, 2024, 3:08 PM IST

रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी

अहमदनगर Nandkishor Ghule Success Story : राज्यात राजाश्रय आणि लोकाश्रयापासून दूर राहिलेल्या वृद्ध कलाकारांची संख्या मोठी आहे. यामध्ये भजन आणि कीर्तन यासारख्या विविध कलाक्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या वृद्ध कलाकारांचा समावेश आहे. वयाच्या साठीतील एक कलाकार 'सावरगाव घुले' (Sawargaon Ghule Village) गावात आहेत. नंदकिशोर बाळाजी घुले असं या कलाकाराचं नाव आहे. ते जन्मापासून अंध आहेत. अंध असूनही ते आज वयाच्या साठीतही उत्कृष्ट, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायक आणि बासरी वादक (Bansuri Vadak) झाले आहेत.

रेडिओ कानाला लावून शिकली 'ही' कला : नंदकिशोर यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. ते सहा महिन्यांचे असतानाच त्यांना अंधत्व आलं. घरची परिस्थितीही हलाखाची आणि नशीबी अंधत्व यामुळं त्यांना शिक्षणही घेता आलं नाही. लहान वयातच अंधत्व आल्यानं ते घरीच राहत होते. त्यामुळं त्याच्या आईनं एक रेडीओ आणून दिला. त्यानंतर रेडिओवर गाणे ऐकत हळूहळू त्यांनी बासरी वाजण्यास सुरूवात केली. ते आज उत्कृष्ट वादक बनले आहेत.

संसाराला पत्नी लाभली साथ : दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही त्यांच्याशी लता यांनी विवाह केला. आज म्हतारपणीही त्यांनी पतीची साथ सोडली नाही. संसाराला पत्नी लता यांची खूप साथ मिळाल्याचं नंदकिशोर घुले कौतुकानं सांगतात. नंदकिशोर हे सावरगाव घुले येथे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. वडील दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही ते उत्कृष्ट वादक आहे. मग आपणही का मागे राहिले पाहिजे? या भावनेनं त्यांचा मुलगा प्रवीणदेखील वडिलांचं पाहून मृदंग वाजवण्यास शिकला आहे. तोसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मृदंग वाजवतो.

शहराबाहेर करतात विविध धार्मिक : आज नंदकिशोर हे धार्मिक कार्यक्रमांसाठी पुणे आणि मुंबई आदी ठिकाणी जातात. या माध्यमातून त्यांनी आज एक वेगळा ठसा उमटवला आहे. तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक कार्यक्रम असल्यास आवर्जून लोक घुले यांना नेण्यासाठी सावरगाव घुले याठिकाणी जातात. त्या माध्यमातून मिळवणाऱ्या मानधनातून ते कुटुंबाचा चरितार्थ चालतात. वृद्ध कलाकारांसाठी शासनाकडून मानधन दिलं जाते. ते मानधन चालू करावं, अशी अपेक्षा नंदकिशोर घुले यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्राचं कलिंगड पोहचलं थेट पश्चिम बंगालला; अहमदनगरच्या युवा शेतकऱ्याची कमाल - Watermelon Success Story
  2. उजाड माळरानात बहरला केशरी, पिवळा पळस; 'हे' आहेत महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्म - Holi Festival 2024
  3. Hariyal Birds Story : वसंतात हरियाल; पिंपळाच्या झाडावर गुंजतोय राज पक्ष्यांचा किलबिलाट, पाहा व्हिडिओ

Last Updated : Mar 26, 2024, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.