ETV Bharat / state

लोकसभेत भाजपा-मनसे युती; विधान परिषद निवडणुकीत मात्र मनसेचं भाजपालाच आव्हान, कोकण पदवीधर मतदारसंघात रंगणार सामना - BJP vs MNS dispute - BJP VS MNS DISPUTE

BJP vs MNS dispute : महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेची भाजपासोबत युती असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार देताना मनसेनं भाजपाशी चर्चा केलेली नाही. (Legislative Council Elections 2024) मनसेनं येथून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर भाजपाकडून अद्यापतरी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. परिणामी, मनसे विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा रंगणार आहे.

BJP Vs MNS Dispute Konkan
भाजपा विरुद्ध मनसे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 5:51 PM IST

मुंबई BJP vs MNS dispute : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्या पाठोपाठ राज्यात विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार आहे. यामध्ये दोन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश असून मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आले असून भाजपाकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. (Konkan Constituency Controversy)

मनसेमुळे भाजपाची कोंडी : दुसरीकडे मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना मैदानात उतरवल्यानं भाजपाची कोंडी केली आहे. या मतदारसंघातून सध्या भाजपाचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. भाजपाने या मतदारसंघात पुन्हा निरंजन डावखरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यास कोकण मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे; परंतु लोकसभेसाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उमेदवाराबाबत आता भाजपा काय भूमिका घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेचा उमेदवार रिंगणात : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्यानं भाजपाची कोंडी झाली आहे. राज्यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई शिक्षक मतदार संघातील आमदार कपिल पाटील त्याचबरोबर नाशिक शिक्षक मतदार संघातून आमदार किशोर दराडे, मुंबई पदवीधर मतदार संघातून आमदार विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांसाठी निवडणुका होत आहेत.

उमेदवारी देण्याआधी मनसेची भाजपाशी चर्चा नाही : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते तोच या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत असल्यानं सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. कोकण पदवीधर मतदार संघातून सध्या भाजपाचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. निरंजन डावखरे यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजपा पूर्ण सकारात्मक असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मतदारसंघातून अभिजीत पानसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही उमेदवारी घोषित करण्यापूर्वी भाजपाशी कोणतीही चर्चा न केल्यानं भाजपाची कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त मोदींसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या कारणाने आता राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार घोषित केल्यानं भाजपा याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांची घटक पक्षांची चर्चा नाही : मुंबई पदवीधर मतदार संघातून उबाठा गटाने विद्यमान आमदार अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदार संघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या दोन्ही उमेदवारी घोषित करताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा न करता उमेदवारी घोषित केल्यानं यावर पुन्हा नव्याने वाद होणार आहेत. तर दुसरीकडं महायुतीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडेच राहणार असल्याचा दावा डॉक्टर दीपक सावंत यांनी केला. या जागेसाठी भाजपाही आग्रही असल्यानं लोकसभेपाठोपाठ विधान परिषद जागांचा पेच सोडवण्यासाठी महायुतीच्या तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

कपिल पाटील यांची यंदा माघार : मागील १८ वर्षे विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदार संघातून प्रतिनिधित्व करत असलेले शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी मात्र यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. कपिल पाटील यांना विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी यंदा या मतदारसंघातून शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. कपिल पाटील हे संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते; परंतु बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाशी आघाडी केल्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी गणराज्य पार्टी हा पक्ष स्थापन केला. तो राज्यातील महाविकास आघाडीचासुद्धा एक घटक पक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल परब, शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी दिलेली असताना आता शिंदे गटाचे डॉक्टर दीपक सावंत यांनीही या जागेवर दावा ठोकला आहे. यासह भाजपासुद्धा ही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मुंबई पदवीधर मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक - Pune Hit And Run Case
  2. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case
  3. राजकोट गेम झोन अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर; ठिणगीनं 2 मिनिटांत घेतला पेट - Rajkot TRP Game Zone Fire

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.