ETV Bharat / state

विशाळगड नुकसानग्रस्तांना इंडिया आघाडीनं दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचं प्रेम; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल - Help To Vishalgarh Victims - HELP TO VISHALGARH VICTIMS

Help To Vishalgarh Victims : कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाच्या जवळ असलेल्या गजापूर गावातील नुकसानग्रस्तांना दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे, असं मत भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे. तसंच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिवभक्तांचा उल्लेख अतिरेकी असा केला, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर वृत्त...

Help To Vishalgarh Victims
धनंजय महाडिक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 10:17 PM IST

कोल्हापूर Help To Vishalgarh Victims : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाच्या जवळ असलेल्या गजापूर गावातील नुकसानग्रस्तांना दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे. कोल्हापुरात जातीय दंगली घडतील असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिवभक्तांचा उल्लेख अतिरेकी असा केला, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीय. कोल्हापूरच्या राजघराण्यात दोन भूमिका कशा? असा सवालही महाडिक त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर टीका करताना (Help To Vishalgarh Victims)

तेव्हा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला स्थगिती का दिली : महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत आहे की, अतिक्रमण केलेल्या नागरिकांसोबत हे त्यांनी जाहीर करावं, असं म्हणत माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सगळं खापर प्रशासनावर फोडलं; मात्र विशाळगडावरील अतिक्रमण आताचं नाही तर 15 ते 20 वर्षांपूर्वीचं आहे. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. तुम्ही गृहराज्यमंत्री होता तेव्हा या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला स्थगिती का दिली? असा सवालही खासदार महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना विचारला. अतिक्रमण काढण्यासाठी निघालेल्या माजी खासदार संभाजीराजेंना प्रशासनाने का थांबवलं नाही, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली होती. मी त्यांना विचारतो तुम्ही का त्यांना थांबवलं नाही? कोल्हापूरच्या राजघराण्यात दोन भूमिका कशा असू शकतात. एकानं म्हणायचं पाडा आणि दुसऱ्यांनी म्हणायचं पाडू नका. आज वर्तमानपत्रात खासदार शाहू महाराज कान धरून उभे राहिले हे पाहून खूप वाईट वाटलं; कारण शाहू महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत, असंही धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

तर ही दुर्दैवी बाब - महाडिक : भाजपा खासदार धनंजय महाडिक हे सतेज पाटील यांच्यावर निशाना साधत पुढे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील दसरा चौकात शालेय मुलांच्या बसवर दगडफेक केली गेली. त्यावेळी तुमचे अश्रू कुठं गेले होते? केवळ मतांचं राजकारण सुरू झालं आहे. गडांवरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व गडांवर असलेली अतिक्रमणे काढली पाहिजेत. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देणार आहोत. विशाळगड घटनेविरोधात एमआयएम पक्षाने कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. याला आक्षेप घेताना खासदार धनंजय महाडिक यांनी या घटनेसाठी आम्ही कोल्हापूरकर सक्षम आहोत. एमआयएम पक्षाचा मोर्चा कोल्हापुरात झाला तर 19 जुलैला कोल्हापूर बंद करण्याची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. ती योग्य असल्याचं खासदार महाडिक यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. विशाळगडावर तणावपूर्ण शांतता; शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना दिला आधार - Vishalgad Violence Case
  2. विशाळगड हिंसाचार प्रकरण; 21 जण ताब्यात तर 500 ते 600 जणांवर गुन्हे दाखल, संभाजीराजेंबाबत पोलिसांचं मौन - Vishalgarh Violence Case
  3. विशाळगड अतिक्रमण मुद्दा; हसन मुश्रीफांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये, संभाजीराजेंनी पिळले कान - Sambhaji Raje Warns Hasan Mushrif

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.