ETV Bharat / state

गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी - गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

Ganpat Gaikwad firing case : शिवसेनेचे कल्यान शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आज उल्हासनार येथील न्यायालयात हजर करण्यात आलं.

BJP MLA Ganpat Gaikwad
भाजपा आमदार गणपत गायकवाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:24 PM IST

Updated : Feb 3, 2024, 7:20 PM IST

ठाणे Ganpat Gaikwad firing case : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलं आहे. गणपत गायकवाड यांनी सकाळपासून जेवण केलेलं नसल्याची माहिती मिळते आहे. तसंच त्यांना घरचे जेवण खाण्याची परवानगी नाही. त्यामुळं आता आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी दिलेलं जेवणच खाव लागणार आहे. तसंच त्यांना कुठली VIP ट्रीटमेंट देण्यात येणार नाहीय. त्यांना सध्या पोलिसांनी झोपण्यासाठी चटई दिली आहे.

पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली : सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात थेट सुनावणीऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा थेट आरोप न्यायालयातचं भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. गोळीबार प्रकणात माझा मुलगा आरोपी नसून त्यालाही आरोपी बनवण्यात आलं, असं देखील गायकवाड यांनी म्हटलं आहे. माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला? असा प्रश्न देखील त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. यावेळी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, गणपत गायकवाड यांनीच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर बंदुक जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हा सुनियोजित कट असल्याचं दिसतं, असं देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. तसंच आमदार गणपत गायकवाड यांच्या आवाजाची चाचणी घ्यायची आहे, त्यामुळं त्यांना 14 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे. मात्र, त्यावर न्यायालयानं गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जमिनीच्या वादातून गोळीबार : जमिनीच्या वादातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याचं पोलीस उपायुक्त दत्ता शिंदे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी त्यांच्यासह दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना कळवा ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर गणपत गायकवाड यांना उल्हासनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी आमदार गणपत गायकवाड तसंच महेश गायकवाड यांचे समर्थक न्यायालय परिसरात मोठ्या संख्येनं जमा झाले होते. त्यामुळं दोन गटात वाद होण्याची शक्यता पाहता, आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

'हे' वाचलंत का :

  1. भाजपा आमदार गोळीबार प्रकरण; देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
  2. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, आमदार अटकेत
  3. रामायणावरुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा; योग्य ती कारवाई होणार, कुलगुरूंनी स्पष्ट केली भूमिका

Last Updated : Feb 3, 2024, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.