ETV Bharat / state

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी 'या' कारणामुळं झाडल्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या - महेश गायकवाड

Ganpat Gaikwad Firing : भाजपा आमदार गणपत गायकवाड तसंच कल्याण शिवसेना शाखाप्रमुख महेश गायकवाड त्यांच्यात जमिनीचा वाद सुरू आहे. याच वादातून काल आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाडांवर सहा गोळ्या झाडल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

Ganpat Gaikwad Firing
Ganpat Gaikwad Firing
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:14 PM IST

दत्ता शिंदे यांनी प्रतिक्रिया

ठाणे Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमध्ये भाजपा तसंच शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी वादावादी झाली. कल्याण पूर्वचं भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा मित्र राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदारांनी थेट उल्हासनगरमधील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी, आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारचं कारणही समोर आलं आहे. याबाबतची संपूर्ण माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

जमीन खरेदी प्रकणातून वाद : कल्याण तालुक्यातील कल्याण-मलंग रस्त्यावरील द्वारली गावातील एकनाथ जाधव कुटुंबीयांची महार वतनाची जमीन आमदार गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती. यातूनच गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात चौनू जाधव यांच्या फिर्यादीनुसार आमदार गणपत गायकवाड, त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, साथीदार विकी गणात्रा, संदीप सरवणकर, हर्षल केणे, नागेश बडेकर आदींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीवर सुरू असलेलं बांधकाम पाडलं : आमदार गणपत गायकवाड यांनी जमीन खरेदी केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याशी वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड हे जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या कंपाऊंडची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड कंपाऊंड पाडताना त्यांना दिसले. त्यानंतर वैभव गायकवाड यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. गणपत गायकवाड यांनी वैभव गायकवाड यांना 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात जाऊन वाद न करता कायदेशीर तक्रार देण्यास सांगितलं होतं.

असा झाला वाद : त्यानंतर वैभव गायकवाड उल्हासनगर येथील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसंच शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील देखील तिथं आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये दोघांत बाचाबाची झाली. त्यावेळी वैभव यांनी पुन्हा आमदारांशी फोनवरून संपर्क साधत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड गायकवाड देखील 'हिल लाइन' पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाडसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार गायकवाड पोलीस ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये गेले. त्या केबिनमध्ये आगोदरच महेश गायकवाडसह त्यांचा साथीदार राहुल पाटील उपस्थित होते.

आमदारांनी झाडल्या सहा गेळ्या : तिघं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिनमध्ये चर्चा करत असताना पुन्हा गणपत गायकवाड यांची महेश पाटील यांच्यात वादावादी झाली. तेव्हा गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बंदुकीतून महेश गायकवाडसह राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, असं अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी सांगितलं. गायकवाड यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानतंर त्यांच्या खासगी अंगरक्षकानं त्यांच्याजवळील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला, असं देखील शिंदे म्हणाले. गणपत गायकवाड यांनी बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतो, त्यावेळी पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.

महेश गायकवाड, आमदार गणपत गायकवाड यांच्यात वर्षानुवर्षे वाद सुरू आहेत, मग तो जमिनीचा वाद असो की राजकीय वाद. तीन ते चार महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड तसंच महेश गायकवाड यांनी एकमेकांच्या विकासकामांवरून आव्हान दिलं होतं. गणपत गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीचा वापर होत, नसून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यामुळं आमदार गणपत गायकवाड नाराज होते. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्यात कधी उद्घाटनावरून, तर कधी मैदानावरून वाद होताहेत. या वादाचा शेवट उल्हासनगरच्या गोळीबाराच्या घटनेत पहायला मिळाला. या घटनेनंतर कल्याण पूर्वेतील शिंदे गटाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता. आतापर्यंत हा बंद शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे वाचलंत का :

  1. 'आत्मरक्षणासाठी केला गोळीबार, मुख्यमंत्र्यांनी राज्यभर गुन्हेगार पाळून ठेवले'; गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप
  2. भाजपा आमदार गोळीबार प्रकरण; देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
  3. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, आमदार अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.