नाशिक Worms in saline : नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी खासगी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सलाईनमध्ये अळी सापडली होती. हा मुद्दा नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या वडाळा रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका बालकावर उपचार सुरू असताना सलाईनमध्ये अळी आढळून आली होती. धीरज सोनवणे यांचा लहान मुलगा हितेश हा व्हायरल इन्फेक्शनने आजारी असल्याने त्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यासंदर्भात धीरज सोनवणे यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे तक्रार केली.
हा तर रुग्णाच्या जीवाशी खेळ : साखळी श्रेणीतील हे मोठं हॉस्पिटल असतानाही त्यांच्याकडून अक्षम्य चूक घडली होती. रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. पुढे मात्र सह्याद्री हॉस्पिटलने हे प्रकरण अंतर्गतरित्या दाबण्याचा प्रयत्न केला; परंतु या घटनेची गंभीर दखल स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांना घ्यावीच लागली. विधिमंडळाच्या अधिवेशनात आईस्क्रीममध्ये आढळलेल्या तुटक्या बोटाचा प्रश्न चर्चेला आला असता त्याला पूरक प्रश्न म्हणून आमदार देवयानी फरांदे यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सलाईनमध्ये अळी आढळून आल्याचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश : अन्न व औषध प्रशासन विभागाने स्थानिक स्तरावर काय कारवाई केली, त्यांनी याकडे का डोळेझाक केली हेही एक कोडे आहे; मात्र या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या विधिमंडळात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सह्याद्री हॉस्पिटल बरोबर संबंधित सलाईन कंपनी यांचीही चौकशी करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा :
- 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी-अवकाळीची मदत, मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती - Heavy rain relief to farmers
- बारामतीत धक्कादायक घटना.. थेट डोक्यात झाडली गोळी, पाच जणांवर गुन्हा दाखल. - Shocking incident in Baramati
- जरांगे पाटलांच्या 'मातोरी' गावात दगडफेक:डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती; दुचाकी फोडल्या...! - Manoj Jarange Matori Village