ETV Bharat / state

लोकसभेतील पराभवानंतरही पंकजा मुंडेंना मिळणार मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीसांची खेळी? - Pankaja Munde Rajya Sabha - PANKAJA MUNDE RAJYA SABHA

Pankaja Munde Rajya Sabha : भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभेतील पराभवानंतर मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वानं मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडं पाठवल्याचीही माहिती समोर आली आहे.

Pankaja Munde, Devendra Fadnavis
पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस (ETV BHARAT MH desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 6:18 PM IST

मुंबई Pankaja Munde Rajya Sabha : लोकसभेतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची पुन्हा राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंडेंच्या पराभवाचं दु:ख सहन न झाल्यानं भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळं मुंडे यांच्याबाबत भाजपा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंडेंना राज्यसभेवर घ्या : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची तयारी पक्षानं सुरू केली आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना लोकसभेत पाठवण्याच्या दृष्टीनेच बीडमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांचा त्यात पराभव झाला. त्यामुळं त्यांचं पुनर्वसन करण्याची भाजपानं तयारी सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीच पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्यावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती आहे. राज्यात सध्या मराठा, ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे.

भाजपाचं ओबीसी कार्ड : ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षाला मदत होणार असल्यानं त्यांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडं पंकजा मुंडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जातात. त्यामुळं त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यास फडणवीस यांचा एक प्रतिस्पर्धी राज्यात कमी होणार असल्याची चर्चा भाजपातचं सुरू आहे. तसंच पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी पुढील मार्ग मोकळे करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं भाजपा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नावानं नवीन कार्ड खेळत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

समर्थकांनी केल्या आत्महत्या : विधानसभा निवडणुकी आगोदरच राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू आहे. त्यातच ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पराभव केलाय. पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यात मोठा दबदबा आहे. त्यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळं काही समर्थकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची चर्चा सतत रंगत होती. यापूर्वीसुद्धा विधानपरिषद तसंच राज्यसभेवर त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांना कोणतीही उमेदवारी त्यावेळी देण्यात आली नाही. या लोकसभा निवडणुकीत भाजपानं पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसनाचा प्रयत्न केला. पण, हे करत असताना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचाच पत्ता कट करून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं. पण तिथंही त्यांचा पराभव झाल्यानं दुहेरी धक्का त्यांना बसला.

ओबीसी मतांचा भाजपाला फायदा : राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते अशी लढत दररोज रंगत आहे. महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर उमेदवारांची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे. त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील भाजपा नेतृत्वाला याबाबत विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. मोदी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यास राज्यात त्याचा फायदा भाजपाला ओबीसी मतपेढीसाठी होईल, अशी शक्यता भाजपाला वाटते. त्यातच एक महिला म्हणून ओबीसी समाजाचे सक्षम नेतृत्व करण्याची संधी पंकजा मुंडे यांना दिली जाऊ शकते.

आक्रमक ओबीसी नेत्या : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेकदा पंकजा मुंडे यांनी पक्षांतर्गत नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. कारण त्यांच्या पुनर्वसनासाठी सतत केंद्रीय नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत होतं. पण यंदा त्यांना लोकसभेचं तिकीट देऊन त्यांची नाराजगी पक्षानं दूर केली. परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांची वर्णी विधान परिषदेवर लावायची की राज्यसभेवर याबाबतही अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. सध्याची राज्यातील परिस्थिती मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटलेला वणवा पाहता पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेणं भाजपाला फायदेमंद ठरणार आहे. त्यातच छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांच्या तोडीस तोड एक महिला म्हणून पंकजा मुंडे आक्रमक ठरू शकतात. म्हणून राज्यातील ओबीसी वोट बँक लक्षात घेता, राज्यसभेवर त्यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे.

'हे' वाचलंत का :

  1. ''...तोपर्यंत उपोषण कायम राहणार''; लक्ष्मण हाके यांची शिष्टमंडळाकडे 'ही' मागणी - OBC reservation
  2. ''बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवलं तसं शिंदे साहेब...'' बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी - Threat to Bachu Kadu
  3. अजित पवार आले म्हणून लंगोट तरी वाचली, उशिरा आले असते तर...; अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर - Amol Mitkari On Ramdas Kadam

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.