ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 4:30 PM IST

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशात हालचालींना वेग आला आहे. भाजपाला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची NDA मध्ये घरवापसी करण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत.

former Chief Minister Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV BHARAT Maharashtra Desk)

मुंबई Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक निकालानंतर NDA चं देशात सरकार स्थापन होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. मात्र, देशात लोकसभा निडणूक निकालामुळं भाजपा देशात चांगलाच झटका बसला आहे. अबकी बार 400 'पार'चा नारा देणाऱ्या महायुतीला देशात 295 जागांवर यश मिळालं आहे. तर, 'भाजपा'नं केवळ 240 जागांवर विजय मिळवलाय. विशेष करून उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात पराभवामुळं भाजपाला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं 30 जागा जिंकून भाजपाची हवाच काढलीय. पुन्हा केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान होताना नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी हातमिळवणी करावी लागतेय. त्यामुळं भाजपाला पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आठवण झालीय. ठाकरे यांच्या सहकार्याशिवाय महाराष्ट्रात पुढची वाटचाल अशक्य असल्याची चाहूल भाजपाला लागलीय. म्हणून उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

राष्ट्रीय नेत्याकडून आलेला प्रस्ताव नाकारला : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयामुळं महायुतीला फटका बसला आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला राज्यात आपली रणनीती बदलावी लागणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी पडद्यामागून सूत्रं हलवली जात आहेत. मुंबईतील एका बड्या उद्योगपतीशी उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. याच उद्योगपतीनं ठाकरे कुटुंबीयांना आपल्या घरी निमंत्रित केलं होतं. परंतु उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी आलेला प्रस्ताव नाकारल्याची माहितीय. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत जायचं नाही, असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं दिसून येतय.

त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे कधीच बंद : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर रसातळाला गेलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलीय. उद्धव ठाकरे यांनी फिरवलेल्या जादुच्या कांडीमुळं शरदचंद्र पवार पक्षाला देखील चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळं खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं दाखवून दिलंय. त्यामुळं शिवसेना पक्षात गेलेले काही आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे सहा आमदार पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात परतण्याचे संकेत मिळत आहेत. यावर बोलताना आमदार सचिन अहिर म्हणाले, 'आम्ही पहिल्यापासून आमचीच खरी शिवसेना असल्याचं सांगत होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालातसुद्ध जनतेनं यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळं तत्कालीन शिवसेनेत बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतणार आहेत. मात्र, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र, त्यांच्या परतीचे दरवाजे आम्ही बंद केल्याचं देखील आहिर यांनी म्हटलंय.

महत्त्वकांक्षा पूर्णत्वास नेण्याचा कौल : याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत जातील, अशी कुठलीही शक्यता दिसत नाही. या भाजपाच्या काही नेत्यांकडून पसरवल्या गेलेल्या अफवा आहेत. जनतेनं महाविकास आघाडीवर विश्वास ठेवत त्यांच्या बाजूनं कौल दिलाय. त्यामुळं जनतेचा विश्वासघात उद्धव ठाकरे करणार नाहीत. भाजपानं उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची संधी 2019 सालीच गमावली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. ती भाजपानं नाकारल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलीय. मात्र, राजकीय समीकरणं पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपानं युती करायला हवी अशी भाजपा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाविकास आघाडीमुळं आगामी विधानसभेत भाजपाला फटका बसू शकतो, असं कार्यकर्त्यांचं मत आहे'. दुसरीकडं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले, 'उद्धव ठाकरे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत जाणार नाहीत. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांना राज्यात जनतेनं विजयी कौल दिला आहे. त्यामुळं ठाकरे जनतेच्या विरोधात जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबतच राहतील'.

हे वाचलंत का :

  1. १० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी - NDA gov formation
  2. प्रफुल पटेलांना मोठा दिलासा, ईडीनं सीजे हाऊसमधील मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई रद्द - Praful Patel Money Laundering Case
  3. लोकसभा निवडणूक निकाल २०२४: शरद पवारांच्या चाणाक्य नीतीनं खेचून आणलं यश भाजपाला दिला 'धोबीपछाड' - Lok Sabha Election Result 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.