ETV Bharat / state

कोकण पदवीधर निवडणूक 2024 : भाजपाच्या निरंजन डावखरेंची विजयाची 'हॅटट्रीक'; काँग्रेसच्या रमेश कीर यांना धक्का - Maharashtra MLC Polls 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 8:19 AM IST

Maharashtra MLC Polls 2024 : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. निरंजन डावखरे यांनी कांग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे कोकण पदवीधर निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली होती.

Maharashtra MLC Polls 2024
निरंजन डावखरे (ETV Bharat)

मुंबई Maharashtra MLC Polls 2024 : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. निरंजन डावखरे यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव करत त्यांना चांगलाच धक्का दिला. पदवीधर निवडणूक 2024 ची कोकण मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ इथल्या आगरी कोळी संस्कृती भवन इथं पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मतं वैध ठरली तर 11 हजार 226 मतं अवैध ठरली, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली.

भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत : कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 मध्ये भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी बाजी मारत काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. त्यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मतं घेवून निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केलं.

उमेदवारांना मिळालेली मतं :

  • निरंजन वसंत डावखरे भारतीय जनता पार्टी : 1 लाख 719
  • कीर रमेश श्रीधर, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष : 28 हजार 585
  • विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना : 536
  • अमोल अनंत पवार, अपक्ष : 200
  • अरुण भिकण भोई, अपक्ष : 310
  • अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष : 302
  • गोकुळ रामजी पाटील, अपक्ष : 424
  • जयपाल परशूराम पाटील, अपक्ष : 64
  • नागेश किसनराव निमकर, अपक्ष : 215
  • प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष : 33
  • मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष : 208
  • शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष : 334
  • श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष : 141

हेही वाचा :

  1. भाजपासाठी शिवसेनेनं केला मोठा त्याग, 'या' मतदारसंघातून घेतला उमेदवारी अर्ज मागं - Graduate Constituency Election
  2. कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार: निरंजन डावखरे भरणार अर्ज - Konkan Graduates Constituency 2024
  3. पदवीधर निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध भाजपात 'सामना'; अभिजित पानसे Vs निरंजन डावखरेंमध्ये 'टाईट फाईट' - vidhan parishad election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.