ETV Bharat / state

'सर्वेश दादा, ऑल द बेस्ट',ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रार्थना.. - Olympics 2024 - OLYMPICS 2024

Olympics 2024 सर्वेश कुशारेची ऑलिम्पिक स्पर्धेतील प्राथमिक पात्रता फेरी आज दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी आहे. या फेरीत त्याला यश मिळावं आणि पुढील स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वेशला पाठबळ मिळावं म्हणून श्री.डी.आर.भोसले विद्यालयात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रार्थना केली.

Olympics 2024
सर्वेश दादा ऑल द बेस्ट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 12:37 PM IST

नाशिक Olympics 2024 : 'बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवो आणि आपणांस यशस्वी होण्यासाठी परमेश्वर आपल्या पंखात बळ देवो'. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळावं, अशी प्रार्थना करत विद्यार्थ्यांनी सर्वेश कुशारेला शुभेच्छा दिल्या.

ऑलिम्पिकमध्ये उंच उडी क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वेश कुशारेसाठी त्याचं शालेय शिक्षण झालेल्या निफाडच्या देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात त्याला भरघोस यश मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून आमच्यासह सर्व देशवासियांचं स्वप्न पूर्ण करावं, अशी अपेक्षा विद्यार्थी, गावकरी आणि सर्वेश कुशारेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

आज प्राथमिक फेरी : सर्वेशची ऑलिम्पिक स्पर्धेतील प्राथमिक पात्रता फेरी आज (बुधवार 7 ऑगस्ट रोजी) भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. या फेरीत त्याला यश मिळावं आणि पुढील स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वेशला पाठबळ मिळावं म्हणून ही प्रार्थना करण्यात आली.

म्हणून आम्ही प्रार्थना केली : ऑलिम्पिक स्पर्धेची विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना उत्कंठा लागली असून श्री. डी. आर. भोसले विद्यालयाचा सर्वेश विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुवर्णपदक मिळावं यासाठी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी मिळून देवाकडे साकडं घातल्याची प्रतिक्रिया शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे यांनी व्यक्त केली.

तो स्वप्न पूर्ण करेल : कोणत्याही सुविधा नसताना तसंच आमची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील त्यानं यश मिळवलं. ही बाब आमच्याबरोबरच संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. लहान गावातून येत हे यश मिळवणं अशक्य होतं. तो नक्कीच यश संपादन करुन देशासाठी गोल्ड मेडल आणेल, असा आमचा विश्वास आहे, असा विश्वास सर्वेशचे वडील अनिल कुशारे व्यक्त केला.

पदक निश्चित आहे : पॅरिसमध्ये सर्वेश वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत आहे. पॅरिसमध्ये मांसाहार जास्त प्रमाणात असल्याने त्याची पंचायत होत आहे, तरी तो विविध प्रकारचे सूप घेऊन आहार संतुलित ठेवत आहे, पात्रफेरीतून तो पुढे गेला तर पदक निश्चित आहे याची मला खात्री आहे, असा दावा सर्वेशचे प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी केला आहे.

अभिमानाची बाब : सर्वेश कुशारे हा उंच उडीत पात्र ठरला ही संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद बाब आहे, तो निश्चित पदक मिळवेल यात शंका नाही, आपण सर्वांनी त्यासाठी प्रार्थना करूया असं मत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

हेही वा

  1. नाशिकच्या सर्वेश कुशारेचा भीम पराक्रम; मक्याच्या भुशावरून थेट पॅरिस ऑलम्पिकमध्ये उडी - Paris Olympics 2024
  2. "मुलगा इतिहासाची पुनरावृत्ती करेल...", अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर नीरजच्या वडील आणि आजोबांची प्रतिक्रिया - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.