ETV Bharat / state

Uddhav Thackeray Speech :"खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार", उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 8:47 PM IST

Updated : Mar 17, 2024, 10:41 PM IST

Uddhav Thackeray Speech : मुंबईतील शिवाजी पार्कात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. यावेळी बोलत असताना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 'भाजपा नेते नेहमीच घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका करत असतात. मी यावर इतकंच म्हणेल की, आम्हाला परिवार आहे, मात्र खुर्ची आणि ते एकटे इतकाच मोदींचा परिवार आहे', असं ठाकरे म्हणाले.

"खुर्ची आणि ते इतकाच मोदींचा परिवार", उद्धव ठाकरेंची मोदींवर जोरदार टोलेबाजी
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी
उद्धव ठाकरे यांचं भाषण

मुंबई Uddhav Thackeray Speech : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज (17 मार्च) मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) मैदानात आज इंडिया आघाडीची भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सभेत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? : यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "हुकुमशाहीला तडीपार करण्यासाठी आजची ही जागा निवडण्यात आली आहे. खरंतर आमचा लढा हा हुकुमशाही विरोधातच आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की देशासाठी मजबूत सरकार हवंय. मात्र, सत्य काय आहे ते आता आम्हाला कळालंय." तसंच भाजपा हा एक फुगा असून त्याच्यात हवा भरायचं काम आम्हीचं केलं. आता ही हवा त्यांच्या डोक्यात गेली असून ती उतरवायला पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

घराणेशाहीच्या टीकेला दिलं जोरदार प्रत्युत्तर : पुढं ते म्हणाले की, "भाजपा नेते नेहमीच घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका करत असतात. मी यावर इतकंच म्हणेल की, आम्हाला परिवार आहे, मात्र खुर्ची आणि ते एकटे इतकाच मोदींचा परिवार आहे. तसंच 2014 पासून यांचं सरकार येतंय. मात्र, आम्ही आता 2024 नाही तर 2047 चा विचार करतोय. सर्वजण एकवटतात तेव्हा खरी ताकद कळते." तसंच देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरंच आपण वाचू. आपली ओळख देश असायला हवा, पण देशाची ओळख कोणी व्यक्ती असायला नको, असंही ते म्हणाले.

अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचाही दिला संदर्भ : भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपुर्वी राज्य घटनेत बदल करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, "संविधान बदलण्यासाठी भाजपाला 400 प्लस व्हायचंय. हे अनंतकुमार हेगडे यांच्या विधानानंतर स्पष्ट दिसतंय. पण आम्ही तसं कधीच होऊ देणार नाही. भाजपानं आता चारशे पार असा नारा दिलाय. असा नारा द्यायला हे काय फर्निचरचे दुकान आहे का? तुम्हाला केवळ खुर्च्या तयार करायच्या आहेत का?", असा सवाल ठाकरेंनी केला. आमचा आता फक्त एकच नारा असेल तो म्हणजे, 'अब की बार भाजपा तडीपार' तसंच आता यांना तोडुन मोडुन टाकल्याशिवाय थांबायचं नाही", असं आव्हानही ठाकरेंनी यावेळी केलं.

हेही वाचा -

  1. LIVE : शिवाजी पार्कमधून 'इंडिया' आघाडीची सभा लाईव्ह
  2. Nyay Sankalp Sabha : भारत हा मोहब्बत वाला देश, मग द्वेष का पसरवला जातोय?- राहुल गांधी
  3. INDIA Alliance Rally Live Updates : बेरोजगारी, महागाई, हिंसा वाढली; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

Last Updated : Mar 17, 2024, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.