ETV Bharat / state

Rahul Gandhi Speech : ओबीसी नसलेले पंतप्रधान मोदी दलित आदिवासांची कैवार घेतीलच कसा, राहुल गांधींचा पालघरमधून मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi Speech : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज (15 मार्च) पालघरमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi alleges PM Narendra Modi not an OBC, during Palghar Speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 7:17 PM IST

भारत जोडो न्याय यात्रा पालघर

पालघर Rahul Gandhi Speech : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरहून सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चं आज (15 मार्च) पालघर जिल्ह्यात आगमन झालं. मोखाडा, जव्हार, पालघर, वाडामार्गे ही यात्रा ठाण्यात पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर टीका केली. तसंच राज्यघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्र्यंबकेश्वरचा मुक्काम करून ते मोखाडा मार्गे जव्हारला आले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं.

राज्यघटना बदलल्याचा कट : माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा समाचार घेताना राहुल गांधी म्हणाले की,"हेगडे यांना भाजपाचे नेते बोलायला भाग पाडतात. आताही संसदेत दोन तृतियांश बहुमताची भाषा करून राज्यघटना बदलण्याचा संकेत हेगडे यांनी दिलाय. परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलू दिली जाणार नाही." तसंच भारतीय राज्यघटना इतकी मजबूत आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय जगातील कोणतीही शक्ती ती बदलू शकत नाही, असंही ते म्हणाले.

आदिवासी दलितांना सत्ता, संपत्तीत भागीदारी नाही : वाडा येथे केलेल्या भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. ते म्हणाले की,"भारतामध्ये 88 टक्के लोक ओबीसी आणि मागास प्रवर्गातील असूनही त्यांना त्या तुलनेत त्यांना योग्य भागीदारी दिली जात नाही."तसंच पीकविमा योजनेसाठी सरकार 35 हजार कोटी रुपये देते. हे पैसे येतात कुठून? 16 कंपन्यांची भरपाई करण्यासाठी सरकार ही तरतूद करते. ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या जमीन अधिग्रहित केल्या जातात असा आरोप त्यांनी केला.

ओबीसींसाठी काय केले : राहुल गांधी पुढं म्हणाले की, मोदी ओबीसी नाहीत, परंतु गुजरातमध्ये भाजपानं कायदा बदलून त्यांची जात ओबीसी केली. प्रश्न मोदी ओबीसी आहेत, की नाही हा नाही तर गेल्या दहा वर्षात मोदींनी ओबीसींसाठी काय केलं हा आहे. ओबीसी, दलित, आदिवासी माध्यमात कुठंही नाहीत. रुग्णालय, खासगी शाळा, कॉलेजमध्ये नाही. या सर्वांच्या मालकांपैकी मागासलेल्या समाजातील लोक किती आहेत? असा सवाल करून त्यांनी जीएसटीच्या नावाखाली कसं लुटलं जातं याची काही उदाहरणं दिली.

...म्हणून भाजपवाले घाबरतात : "देशाचे पंतप्रधान मोदी ओबीसी आहेत. त्यामुळं ओबीसी पंतप्रधान देश चालवतो असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. देशातील सरकार, आमदार, खासदार देश चालवत नाहीत, तर भारतातील 90 आयएएस अधिकारी चालवतात. हे सर्व अधिकारी कोणत्या वर्गातील आहेत हे सांगणं आवश्यक नाही. पण मी खरं तेच सांगतो, म्हणून भाजपावाले मला घाबरतात", अशी टीका राहुल यांनी केली.

हेही वाचा -

  1. Bharat Jodo Nyay Yatra: गरिबांवर अन्याय होत असल्यानं 'न्याय' हा शब्द यात्रेत जोडला- राहुल गांधी
  2. Rahul Gandhi : राहुल गांधी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन, महिलांसाठी केली मोठी घोषणा
  3. Rahul Gandhi : मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख करोड रुपये माफ केले, शेतकऱ्यांचा एक रुपयाही नाही; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.