ETV Bharat / state

रिमझिम पावसानं 'मिनी काश्मीर'चं सौंदर्य खुललं, महाबळेश्वरात पावसाळी पर्यटन हंगाम सुरू - Maharashtra Hill Stations - MAHARASHTRA HILL STATIONS

Maharashtra Hill Stations: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर' अर्थात महाबळेश्वरात (Mahabaleshwar) रिमझिम पाऊस सुरू आहे. अधूनमधून दाट धुक्यांचा अनुभव पर्यटक घेत आहे. पावसामुळं महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं असून पावसाळी पर्यटन हंगामाला सुरूवात झाली आहे.

Mini Kashmir
महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:51 PM IST

सातारा Maharashtra Hill Stations : महाबळेश्वरातील (Mahabaleshwar) पावसाळी पर्यटन हंगामाला (Raining In Mahabaleshwar) सुरूवात झाली आहे. पर्यटक रिमझित पावसात भिजण्याचा आनंद लुटत आहेत. पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. पावसाची रिमझिम बरसात, कडाक्याची थंडी, हिरवागार निसर्ग अन् धुक्यात लपटलेले वातावरण, याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. पाऊस आणि धुक्यामुळं महाबळेश्वरचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. मात्र, दमदार पावसाअभावी धबधबे अजुन प्रवाहीत झालेले नाहीत.

पाऊस आणि धुक्यामुळं महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं (ETV BHARAT Reporter)

पर्यटनासाठी महाबळेश्वर, पाचगणी सज्ज : थंड हवेची ठिकाणे असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. उन्हाळ्यात या दोन्ही पर्यटनस्थळांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळते. हिवाळ्यात महाबळेश्वरची थंडी आणि धुकं ही देखील पर्यटकांसाठी पर्वणी असते. पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळी हंगामासाठी महाबळेश्वर आणि पाचगणी सज्ज झाली आहे. मात्र, पावसाचा जोर अजुन वाढलेला नाही.

रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद : महाबळेश्वरात अजून दमदार पावसाला सुरूवात झालेली नाही. मात्र, दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असते. रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद लुटत पर्यटक विविध पॉईंट्ना भेटी देत आहेत. गरमागरम भजी, भाजलेल्या मक्याच्या कणसावर ताव मारताना दिसत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिका प्रशासनाने केलेल्या सुविधांची पर्यटक प्रशंसा करत आहेत.

कास पठारावर फुलांच्या संरक्षणासाठी जाळी : जागतिक वारसास्थळ आणि जगप्रसिध्द कास पुष्प पठारावर एक दीड महिन्यांनी फुलांचा हंगाम सुरू होईल. हंगामात विविधरंगी तसेच दुर्मिळ जातीची फुले उमलतात. हा फुलोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देतात. सध्या मान्सून पूर्व पावसामुळं पठारावर हिरवळ पसरली आहे. फुलांच्या संरक्षणासाठी कास पठारावर नुकतीच तंगुसाची जाळी लावण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Hill Stations : महाराष्ट्रातील 'या' तीन हिल स्टेशनला नक्की भेट द्या
  2. रखरखत्या उन्हात 'रोमँटिक गारवा' हवाय? महाराष्ट्रातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या
  3. Mahabaleshwar Rain : महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.