ETV Bharat / state

चुलीवरचा गरमागरम बरबटी वडा; मेळघाटातील घटांगचा खास ब्रँड - Ghatang Famous Barbati Wada - GHATANG FAMOUS BARBATI WADA

Ghatang Famous Barbati Wada : महाराष्ट्रातील प्रत्येक खाद्यप्रेमींचा आवडता आणि तितकाच लाडका पदार्थ म्हणजे 'बरबटीचे वडे'. चुलीवर ठेवलेल्या मोठ्या कढईतील गरमागरम 'बरबटीचे वडे' (Barbati Wada) आणि त्यासोबत चवीला कढी खायाची असेल तर, मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या घटांग (Ghatang) येथे नक्की भेट द्या.

Ghatang Famous Barbati Wada
घटांगचा खास बरबटी वडा (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 11:32 AM IST

अमरावती Ghatang Famous Barbati Wada : धारणीच्या दिशेने मेळघाटात एन्ट्री करताच बिहाली नंतर लगेच लागणारं दुसरं गाव म्हणजे घटांग. केवळ रस्त्यावरच गाव म्हणून घटांची (Ghatang) ओळख गत चार-पाच वर्षांपासून पुसली गेली. आज घटांग म्हणजे खास गरमागरम बरबटी वड्यांचं (Barbati Wada) स्पेशल ठिकाण म्हणून ओळखल्या जातं.

बनवताना गरमागरम बरबटी वडा मुन्नाभाई वडेवाले (Etv Bharat Reporter)

हॉटेलवर खवय्यांची मोठी गर्दी : अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत चुलीवर ठेवलेल्या मोठ्या कढईत 'बरबटीचे वडे' उकळत्या तेलातून काढले जातात. कढईतून वडा बाहेर येतात त्याच्यावर ताव मारण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दीच हॉटेलवर अगदी तुटून पडते. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या घटांग येथील बरबटी वड्याचे खासियत उलगडणारा हा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट.

तुटक्या फुटक्या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी : परतवाड्यावरून इंदोर आणि धारणीच्या दिशेने जाताना घटांग या गावात डाव्या बाजूला वनविभागाच्या कार्यालयाजवळच तुटक्या फुटक्या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी बाराही महिने दिसते. या हॉटेलचे मालक मुन्नाभाई वडेवाले सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत सतत या हॉटेलमध्ये बरबटीचे वडे गरम तेलातून काढताना दिसतात. सर्वसामान्यपणे मुगाचे वडे सर्वत्र मिळतात मात्र, मुन्नाभाई मुळे अख्ख्या घटांगमध्ये 'बरबटी वडे' फेमस झाले आहेत.

दिवसभरात हजार वडे : हॉटेलमध्ये मुन्नाभाई दिवसभरात बरबटीचे 1 हजार वडे नियमित करतात. बरबटीच्या ह्या वड्यांसोबत छान चवदार कढी दिली जाते. चवदार कढी सोबत गरम वडे खाण्याची खास मजा अनुभवण्यासाठी मुन्नाभाई यांच्या हॉटेलमध्ये मेळघाटात येणारे पर्यटक गर्दी करतात. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम वडे खाण्याची मजा काही औरच. जंगलाच्या मार्गावरून पावसात भिजून आलेल्या खवय्यांना गरमागरम बरबटी वडे आगळावेगळा आनंद देतात.

दिवसभरात 800 ते 1000 वड्यांची विक्री : थंडीमुळं कुडकुडणारे अनेक प्रवासी तर कढईतून वडे बाहेर येईल तोवर कढई खाली पेटलेल्या चुलीजवळ बसून छान उब देखील घेतात. बऱ्याचदा तर हिवाळ्यात थंडीत कुडकुडत येणाऱ्यांसाठी चुलीजवळ ऊब घेण्यास खास जागा देखील आम्ही करून देतो असं मुन्ना वडेवाले 'ईटीव्ही भारत'शी. बोलताना म्हणाले. दिवसभरात 800 ते 1000 वड्यांची विक्री होते. एकूण दहा हजार रुपयांचा गल्ला केवळ बरबटीच्या वड्यांद्वारे होतो अशी माहिती देखील मुन्नाभाई यांनी दिली.

बारा रुपयात एक आणि 25 रुपयात दोन वडे : अगदी रस्त्यावरूनच आपल्या लाकडाच्या आणि तुराट्यांच्या हॉटेलमध्ये चुलीखाली पेटलेल्या विस्तवावरील कढईतून मस्त बरबटी वडे काढत असताना मुन्नाभाई नजरेत भरतात. या हॉटेलमध्ये अनेकदा पाय ठेवायला जागा नसली तरी जो कोणी व्यक्ती या हॉटेलमध्ये पाय ठेवतो त्याला गरम वडे खाण्याचा मोह आवरत नाही. बरबटीचा एक वडा हा 12 रुपयाला तर एक प्लेट अर्थात दोन वडे हे पंचवीस रुपयात या ठिकाणी मिळतात. अतिशय चवदार असणाऱ्या या वड्यांसोबत मस्त कढी आणि हिरवी मिरची देखील दिली जाते. हे वडे एक किंवा दोन घेतले तरी कढी मात्र वाटेल तितकी मुन्नाभाई आणि त्यांचा मुलगा रोशन हे अगदी आनंदाने देतात.

अशी आहे बरबटी वड्याची रेसिपी : बरबटी वडा या प्रकाराचा शोध घटांग येथील रहिवाशांनीच लावला. बरबटींची 20 किलो दाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली जाते. सकाळी भिजवलेली बरबटीची डाळ पाट्यावर वाटली जाते. यानंतर यामध्ये पालक, सांभार, हिरवी मिरची, कांदा टाकून वडे तयार केली जातात. वीस पंचवीस वर्षांपासून घटांग येथील ह्या हॉटेलमध्ये बरबटीचे वडे विकत असल्याचं मुन्नाभाई सांगतात.

बरबटीच्या वड्यांमुळं घटांगला नवी ओळख : अगदी आठ-दहा वर्षांपूर्वी धारणी आणि इंदोरकडे जाणारे प्रत्येक वाहन हे सेमाडोह या ठिकाणी थांबा घ्यायचे. सेमाडोह येथील दही, रबडीवर ताव मारल्यावरच पुढचा प्रवास सुरू व्हायचा. आता मात्र, पाच-सहा वर्षांपासून घटांचा मुन्नाभाई यांच्या हॉटेलमधला बरबटी वडा प्रचंड फेमस झाला. या बरबटी वड्यामुळं घटांग या छोट्याशा गावाला नवी ओळख मिळाली.

आणखी काही तरुणांनी थाटले हॉटेल : मुन्नाभाई यांचं हॉटेल खास बरबटी वड्यांमुळं प्रसिद्ध झालं असतानाच गावातील आणखी तीन-चार तरुणांनी स्वतंत्र असे बरबटी वडांचे हॉटेल थाटले. मुन्नाभाई यांच्या हॉटेलमध्ये अनेकदा एका बरबटी वड्या करिता अर्धा ते एक तासापर्यंत वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत अनेक खवय्ये लगतच्या इतर हॉटेलमध्ये जाऊन घटांच्या स्पेशल बरबटी वड्यांचा आस्वाद घेतात.

हेही वाचा -

  1. सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
  2. छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple
  3. दारूबंदी ते कृषी क्रांती: हिरकणी पुरस्कारानं सन्मानित ममता ठाकूर यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून खास निमंत्रण - Independence Day Invitation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.