ETV Bharat / state

निंबूत गोळीबार प्रकरणातील जखमी रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू - Baramati Firing Case - BARAMATI FIRING CASE

Baramati Firing Case : बारामती तालुक्यातील निंबूत येथील सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी 27 तारखेच्या रात्री गोळीबार झाला होता. त्यात फलटणमधील रणजित निंबाळकर यांचं उपचारादरम्यान आज पहाटे 2 वाजता पुण्यात निधन झालं.

Ranjit Nimbalkar
रणजीत निंबाळकर (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 3:46 PM IST

बारामती Baramati Firing Case : बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैल खरेदीच्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेतील जखमी रणजीत निंबाळकर यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या घटनेनंतर बारामती, फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याआधारे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडेंसह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पैशावरून वाद : काही दिवसांपूर्वी निंबूत येथील ट्रिपल हिंदकेसरी गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती. 37 लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरलेला होता. त्यामध्ये रणजीत निंबाळकर यांना पाच लाख रुपये गौतम काकडे यांनी विसारत म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम कागदपत्र पूर्ण करून देण्याचं ठरवण्यात आलं होतं.

बाचाबाचीतून गोळीबार : गुरुवारी रात्री रणजीत निंबाळकर हे आपली पत्नी तसंच मित्रांसह निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी रणजीत निंबाळकर यांनी उर्वरीत रक्कम द्यावी, किंवा विसारतची रक्कम घेऊन बैल परत करा असं सांगितलं. तुम्ही कागदपत्रांवर सह्या करा तुम्हाला सकाळपर्यंत पैसे मिळतील, असं गौतम काकडे सांगत होते. यातून दोघांमध्ये झालेल्या वादातून गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला.

निंबाळकरांच्या डोक्यात लागली गोळी : रणजीत निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्यानं ते जागेवरच कोसळले. सुरुवातीला त्यांना बारामतीत उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र, गंभीर परिस्थितीमुळं त्यांना पुण्यात हलवण्यात आलं होतं. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रणजीत निंबाळकर यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर बारामती, फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रातही खळबळ उडाली आहेत. रणजीत निंबाळकर फलटण परिसरात 'सर' नावानं परिचित होते. ते सैन्य, पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का :

  1. अल्पवयीन मुलानं टँकर चालवत व्यायामासाठी चाललेल्या मुलांना उडवलं, दोन महिला जखमी - Pune Accident News
  2. NEET पेपर लिक प्रकरण ; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case
  3. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; स्विफ्ट आणि अर्टिगाची समोरासमोर धडक, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Samruddhi Highway Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.