ETV Bharat / state

तरुण शेतकऱ्यानं डोंगरदऱ्यात फुलवली केळीची बाग; इराणला लागली केळींची गोडी - BANANA FARMING STORY

संगमनेर तालुक्यातील कोंची येथील किरण गोसावी या तरूणानं पाण्याची कमतरता असताना देखील उत्तम नियोजन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत केळीची यशस्वी शेती करून दाखवली.

BANANA FARMING STORY
केळीची शेती (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 14 hours ago

Updated : 14 hours ago

अहिल्यानगर : चारही बाजूंनी डोंगरदऱ्या, पाण्याचाही कुठलाच शाश्वत स्रोत नाही, मात्र अशा कठीण परिस्थितीतही 9 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनचं पाणी आणून दीड एकर क्षेत्रात पठ्ठ्यानं केळीची बाग फुलवली. या केळींची गोडी थेट इराणला लागली आहे. सध्या या केळींना प्रतिकिलो बावीस रुपयांचा बाजारभाव मिळाला. पहिल्याच तोड्यात 10 टन माल निघाला आहे, आणखी 30 टन माल निघणार आहे. ही यशोगाथा संगमनेर तालुक्यातील कोंची येथील किरण गोसावी या तरूण शेतकर्‍याची आहे.

Banana Farming Story
केळीची शेती (Source - ETV Bharat Reporter)

शेडनेटमध्ये केळीचं पीक : किरण गोसावी हे शेतकरी नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असतात. हा भाग डोंगरदऱ्यात असल्यानं पावसावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत गोसावी यांनी प्रथम शेततळ्याची निर्मिती केली आणि थेट 9 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनव्दारे पाणी आणून ते दीड एकर क्षेत्रात बनवलेल्या शेततळ्यात सोडलं. यानंतर त्यांनी दीड एकर क्षेत्रात शेडनेटमध्ये फेब्रुवारी महिन्यात केळीच्या रोपांची लागवड केली. विशेष बाब म्हणजे शेडनेटमध्ये केळीचं पीक घेतल्यानं केळीही अतिशय उत्तम दर्जाची आली आहेत. साडेनऊ महिन्यांनंतर केळीचे घड काढणीस आले. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील व्यापारानं कोंची येथे येऊन केळींची पाहणी केली आणि प्रतिकिलो 22 रुपये याप्रमाणे केळी खरेदी केली.

तरुण शेतकऱ्यानं डोंगरदऱ्यात फुलवली केळीची बाग; इराणला लागली केळींची गोडी (Source - ETV Bharat Reporter)

केळी थेट इराणला : गोसावी यांनी पिकवलेली केळी परदेशात पाठवण्यात आली आहे. पहिल्याच तोड्यात 10 टन माल निघाला असून जवळपास सव्वा 2 लाख रुपये नफा झाला आहे. आणखी 30 टन माल निघणार असल्याचं गोसावी यांनी सांगितलं. फेब्रुवारी ते मार्चपर्यंतच परिसरात पाणी असतं, यानंतर पाणीटंचाई निर्माण होते. मात्र असं असताना देखील केवळ शेततळ्याच्या माध्यमातून किरण गोसावी या तरूणानं शेडनेटमध्ये केळीची बाग फुलवली, त्यामुळं केळींचा आकारही चांगला झाला असून अनेक फायदे झाले. त्यामुळं या केळींची गोडी थेट इराणला लागली आहे. गोसावी हे नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत आहेत. मात्र यावेळेस त्यांनी केळी पिकाच्या माध्यमातून थेट इराणला झेप घेतली आहे. त्यामुळं त्यांची ही यशोगाथा इतर शेतकर्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी असल्याचं दिसून येत आहे.

पाण्याची कमतरता असूनही उत्तम नियोजन : 10 फेब्रुवारीला शेडनेटमध्ये मल्चिंग पेपरवर केळीच्या रोपांची लागवड केली होती. यानंतर साडे नऊ महिन्यांनंतर केळीचे घड काढणीस आले आहेत. प्रतिकिलो 22 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. पाण्याची कमतरता असताना देखील उत्तम नियोजन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत पीक यशस्वी करून दाखवलं. विशेष बाब म्हणजे शेडनेटमध्ये केळीचं पीक घेतल्यानं त्याचे अनेक फायदे झाले आहेत. किरण गोसावी यांनी साडेसहा बाय पाच फुटांवर केळीच्या रोपांची लागवड केली. एकूण 1250 केळींची रोपं त्यांनी लावली.

केळीच्या पिकावर झालेला खर्च : रोपं, खत-औषधं, मोलमजुरी असा सुरूवातीपासून एकूण 1 लाख 10 हजार रुपये केळीच्या पिकावर खर्च झाला आहे. विशेष बाब म्हणजे शेडनेटमध्ये पीक घेतल्यानं फवारणीचा खर्च देखील कमी आला आहे. अतिशय उत्तम दर्जाचा माल तयार झाला, त्यामुळं बाजारभाव चांगला मिळाला आहे.

शेडनेटमध्ये रोपांची लागवड करण्याचे फायदे

  • मजुरी कमी लागली
  • औषधांची मोठ्या प्रमाणात बचत
  • कमी कालावधीत पीक
  • वादळ-वार्‍यापासून पिकाचं संरक्षण
  • पाण्याची मोठी बचत
  • फळांचा आकार चांगला
  • मल्चिंग पेपरमुळं रोपांच्या आजूबाजूला गवत येत नाही
  • रोपांवर वातावरणाचा परिणाम होत नाही

हेही वाचा

  1. मेळघाटात 'गव्हाचं कोठार' झालं हिरवंगार; टपोरे दाणे, खायला चवदार म्हणून मसोंडी गव्हाची ओळख, वर्षाकाठी 'इतकं' होते उत्पन्न
  2. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केळी; अनेक भागात भरघोस उत्पादन
  3. कधीही न आटणाऱ्या विहिरीतून सतत वाहतो पाण्याचा झरा, गावात विहिरीची 'बाळ समुद्र' अशी ओळख

Last Updated : 14 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.