पुणे Bakri Eid 2024 : बकरी ईदनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात बोकडांच्या खरेदी-विक्रीसाठी गर्दी होत आहे. या निमित्तानं देशभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीसाठी बोकडांची खरेदी-विक्री केली जाते. बकरी ईद यंदा 17 जूनला आहे. बकरी ईदनिमित्त देशभरातील बाजारपेठांमध्ये बकऱ्यांची खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र, यावेळी बाजारात मंदी असल्याचं बोकड व्यापाऱ्यांनी सांगितलं.
गावरान बोकडांना मागणी : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद यंदा 17 जूनला साजरा होत आहे. यानिमित्तानं पुण्यातील भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात दरवर्षी ईदनिमित्त बोकड बाजार भरतो. यंदाही राज्यासह देशाच्या विविध भागातून बोकड बाजारात दाखल झाले आहेत. दरवर्षी राजस्थान तसंच खान्देश आणि देशाच्या इतर भागातून बोकडांना मोठी मागणी असते. यंदा बाजारात गावरान बोकडांना जास्त मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मात्र, नागरिकांकडं पैसे नसल्यानं मालाला भाव मिळत नसल्याचं व्यापारी सांगत आहेत.
आवक वाढल्यानं किंमत कमी : दरवर्षी बकरी ईदनिमित्त बाजारात हजारो रुपये किमतीच्या बोकडांची खरेदी होते. यंदा पुण्यातील लक्ष्मी बाजारात सर्वाधिक 70 ते 80 हजार रुपयांना बोकडांची विक्री झाली. तसंच सामान्य बोकडांची खरेदी किंमत 15 ते 20 हजार रुपये होती. बाजारात बोकड अधिक आल्यानं किंमत कमी झाल्याचं व्यापारी म्हणतात. मंदी जरी असली तरी नागरिक बोकड बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
'हे' वाचलंत का :