हैदराबाद : भारतीय संस्कृतीत केवळ मानवी नात्यांनाच नव्हे तर प्राण्यांनाही खास स्थान आहे. अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. दरवर्षी श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो.
बैलपोळ्याला बैलाला खास सजवून गावातील मिरवणुकीत नेले जाते. या दिवशी शेतकरी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाही. उलट बैलाच्या खाद्यांला आराम वाटावा म्हणून त्याच्या पाठीची मळणी केली जाते. बैलजोडीला धुतले जाते. पंरपरेनुसार शेतकरी आज बैलांची वेसण, म्होरक्या नवीन घेतात.
बळीराजा हा शेतात राबणाऱ्या आपल्या सवंगड्याला रुबाबाने सजवतो व त्याचा कौतुक सोहळा साजरा करतो तो दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकरी आणि बैल यांच्यातील हा स्नेहांकीत बंध असाच कायम राहील. बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/krhcVvhEB4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 2, 2024
काही भागात दोन दिवस साजरा होतो सण : कृषिप्रधान भारतात बळीराजा अर्थात शेतकऱ्यासाठी बैल हा कुटुंबातील घटकासारख्याच असतात. त्यामुळे बैलपोळ्याला बैलाला आवडीनं पुरणपोळी खायला देतात. महाराष्ट्राच्या काही भागात बैलपोळा सण दोन दिवस साजरा केला जातो. 'बैलपोळा' म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा म्हटले जाते. दुसर्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात. हा दिवस 'तान्हा पोळा' म्हणून साजरा केला जातो.
आठवणीतील बैल पोळा! एक काळ होता बाप गरीब होता पण बैलजोडी पोसायची हिंमत होती. घरात सर्व आबादानी होती.आज यांत्रिकीकरण झालं आणि बळीराजाचा जिवलग सण पोळा हळूहळू कालबाह्य झाला.आता पुढच्या पिढीला केवळ पिठोरी पटावरच पोळा दिसेल. #बैलपोळा pic.twitter.com/3fuiR1E7WF
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 1, 2024
असा साजरा केला जातो बैलपोळा : बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपानं शेक देऊन चोळतात. हौस म्हणून अनेक शेतकरी बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा घालतात. शेतातून बैल गावातील घरासमोर आणून त्यांची पूजा केली जाते. बैलाला पुरणपोळी खायला दिली जाते. गावातल्या सर्व बैलजोड्यांची ढोल, ताशे वाजवून मिरवणूक काढली जाते.
बळीराजाच्या कष्टाच्या कामात बळीराजाला साथ देणारा त्याचा खरा मित्र म्हणजे बैल ! बैलासोबत बळीराजाचं जिव्हाळ्याचं नातं असतं. बैलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा! बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!#bailpola #बैलपोळा pic.twitter.com/4GGK5cQUsM
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) September 2, 2024
बैलांची जागा ट्रॅक्टरनं घेतली : आज कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्यानं बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली आहे. बैलजोड्यांची संख्या कमी होत चालली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना आजही बैलजोडी असणं प्रतिष्ठेचं आणि समाधानाचं वाटते. महाराष्ट्रातील अनेक भागात बैलगाडी शर्यतीमुळे बैलांची खास देखरेख केली जाते.
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
आपल्या समृध्द अशा कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण, आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा " बैलपोळा" सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..#बैलपोळा pic.twitter.com/rmZFOKbBiw
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 2, 2024
राजकीय नेत्यांनी बैलपोळाच्या दिल्या शुभेच्छा
- शरद पवार- बळीराजा हा शेतात राबणाऱ्या आपल्या सवंगड्याला रुबाबाने सजवतो व त्याचा कौतुक सोहळा साजरा करतो तो दिवस म्हणजे बैलपोळा. शेतकरी आणि बैल यांच्यातील हा स्नेहांकीत बंध असाच कायम राहील. बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
- शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष-सर्जा-राजाचा गौरव केला जाणारा बैलपोळा हा कृषिप्रधान संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. उत्साहाने आणि आनंदाने साजरा केल्या जाणाऱ्या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
- नाना पटोले- आपल्या समृध्द अशा कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण, आपल्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा "बैलपोळा" सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा.
- छगन भुजबळ- बळीराजाच्या कष्टाच्या कामात बळीराजाला साथ देणारा त्याचा खरा मित्र म्हणजे बैल ! बैलासोबत बळीराजाचं जिव्हाळ्याचं नातं असतं. बैलाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा! बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!