ETV Bharat / state

"बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका...", बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्ट मत - Badlapur School Case - BADLAPUR SCHOOL CASE

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला. त्यावर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी संताप व्यक्त केलाय. "महिला आणि मुलांच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस विभागात स्वतंत्र विभाग असायला हवा, असं मत बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलं.

Badlapur School Case
सुशीबेन शाह (Source - Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 6:51 PM IST

मुंबई Badlapur School Case : बदलापूर येथील एका शाळेत सफाई कामगारानं दोन अल्पवयीन मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद बदलापूरसह संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महिला व बालकांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शाखेच्या धर्तीवर विशेष शाखा किंवा 'छोटेखानी पोलीस स्टेशन' असावं, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं राज्य सरकारकडं केली आहे. यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

सुशीबेन शाह यांची प्रतिक्रिया (Source - Etv Bharat Reporter)

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह म्हणाल्या की, "पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी महिला मदत कक्ष, लहान मुलांसाठी विशेष पोलीस तुकडी आणि बालकल्याण पोलीस अधिकारी तैनात असतात. मात्र, हे अधिकारी प्रत्येक वेळी महिला आणि बालकांच्या तक्रारी घेण्यासाठी उपलब्ध नसतात. अनेकदा या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी ड्युटी दिली जाते. त्यामुळे महिला किंवा बालकांच्या प्रकरणांमधील तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी अनेकदा पुरेसे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पोलीस स्टेशनमध्ये नसते."

स्वतंत्र यंत्रणा असणं आवश्यक : "प्रत्येक पोलीस स्टेशनातील गुन्हे शाखा हे फक्त गुन्ह्याचा तपास करण्यासाठी राखीव असतात. त्यांना इतर कोणत्याही प्रकारची ड्युटी लावली जात नाही. गुन्ह्यांचा छडा लावणे आणि योग्य पद्धतीनं तपास करणे, ही त्यांच्याकडे जबाबदारी असते. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 70 टक्के लोकसंख्या ही महिला आणि बालकांची आहे. या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण सुरक्षा पुरवण्याच्या प्रक्रियेतून वगळू शकत नाही. त्याचाच विचार करून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला आणि बालकांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंदणी, तपास आणि उकल करणारी गुन्हे शाखेसारखी स्वतंत्र शाखा असणं आवश्यक आहे," असं सुशीबेन शाह यांनी सांगितलं.

पोलिसांची भूमिका वादग्रस्त : "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पोलिसांची भूमिका निश्चितच वादग्रस्त होती. संबंधित महिला पोलीस निरीक्षक असतानाही त्यांनी गुन्हा नोंदविण्याबाबत संवेदनशीलता दाखवली नाही. त्यामुळं गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. महिला आणि बालकांच्या तक्रारींसाठी पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र शाखा असल्यास महिला व बालकांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद होणे आणि तपास होणे आदी गोष्टी सुरळीत होतील," असं सुशीबेन शाह म्हणाल्या.

हेही वाचा

  1. बदलापूर अत्याचार प्रकरण ; नराधम अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, बदलापुरात तणावपूर्ण शांतता - Badlapur Minor Girl Sexual Assault
  2. धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl
  3. साडेचार वर्षीय बलिकेचं अपहरण करून लैंगिक अत्याचार! संशयित पोलिसांच्या ताब्यात, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील घटना - girl kidnapped and raped
  4. बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.