ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वर येथे गाव जेवणात जातीनिहाय पंगतीची कुप्रथा मोडली, 'अंनिस'च्या लढ्याला मोठे यश - Trimbakeshwar Village Meals Issue

Trimbakeshwar Cast Wise Discrimination : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंंबकेश्वर येथे ग्रामदेवता महादेवीच्या नावाने मागील अनेक वर्षांपासून विशिष्ट जातीच्या लोकांची वेगळी पंगत बसवण्याची प्रथा आहे. या सामाजिक कुप्रथेविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाज उचलला. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने ही प्रथा बंद झाली.

Trimbakeshwar Cast Wise Discrimination
जातिभेद विसरून सामूहिक भोजन घेताना गावकरी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 6:44 PM IST

जातिनिहाय पंगतीला मुठमाती दिल्यानंतर जातीभेद विसरून भोजन घेताना गावकरी (Reporter)

नाशिक Trimbakeshwar Cast Wise Discrimination : त्र्यंबकेश्वर येथे मागील शेकडो वर्षांपासूनची ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरू केलेली गाव जेवणाची परंपरा आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि जेवणासाठी त्यांची वेगळी पंगत बसण्याची परंपरा महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नातून बंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कुप्रथेविरोधात पुकारलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झालेले आहे.

कुप्रथा अंनिसच्या कार्यकर्त्यांना कळाली आणि : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्ट कडून लोकवर्गणी जमा केली जाते. त्यातून ह्या गावजेवणाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये साधारण दहा हजाराहून अधिक लोक जेवण करतात; मात्र गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या शिद्यातून वेगळे शिजवले जाते. या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाजबांधवापासून वेगळी बसण्याची पद्धत होती. ही बाब मागील वर्षी अंनिसच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांना कळाली. त्यावेळी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन ही पंगतीभेदाची कुप्रथा थांबविण्यात आली होती.

पंगतीभेदाची अनिष्ट प्रथा मिटवण्याचा प्रयत्न : ह्या वर्षीची गावपंगत शुक्रवार ३ मे ,२०२४ रोजी होणार असल्याचे समजले होते. त्यात जातीनिहाय वेगवेगळ्या पंगती बसविणार असल्याची चर्चा सुरू झाली. लोकांच्या इच्छेने गावजेवण होत असेल तर त्याला विरोध न करता, ह्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील, ही भूमिका अंनिसने घेतली. त्याआशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वरच्या तहसिलदार श्वेता संचेती आणि पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर बिपीन शेवाळे यांना देण्यात आले होते. पंगती भेदाबाबत ही अनिष्ट, अमानवीय, राज्य घटनेशी विसंगत असून सामाजिक विषमतेला बळ देणारी बाब आहे हे तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांना तोंडी तसेच लेखी निवेदनातून अंनिसचे म्हटलं होतं.

जातीनिहाय पंगत प्रथा बंद : खरे तर ही कुप्रथा मागील वर्षीच थांबविण्यात आली होती; परंतु यावर्षी वेगवेगळ्या पंगती बसणार असल्याची चर्चा कानावर आल्याने अंनिसच्या जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढलो. त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले आहे असं अंनिसचे कार्याध्यक्ष संजय हराळे यांनी म्हटलं.

हेही वाचा :

  1. अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षाचा परिचारिकेवर बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Palghar Crime
  2. सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग; ग्रामस्थांचा गराडा - Army Helicopter Emergency Landing
  3. कांद्यावरील निर्यातबंदी हटवली खरी पण जबर निर्यात शुल्क लागू, महायुतीच्या उमेदवारांना होणार का फायदा? - onion exports

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.