मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मारेकरी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात होते, असा दावा मुंबई पोलिसांनी केला. एका मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून मारेकऱ्यांनी कॅनडा आणि अमेरिकेत अनमोल बिश्नोईशी संपर्क साधून त्यानंतर ते मेसेज डिलीट केल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
NCP leader Baba Siddiqui murder case | The shooters were in contact with Lawrence Bishnoi's brother Anmol Bishnoi before the murder of Baba Siddiqui. The three suspected shooters who committed the murder had talked to Anmol Bishnoi through an instant messaging app (Snapchat)…
— ANI (@ANI) October 23, 2024
हत्याकांडातील तीन शार्प शूटर होते अनमोल बिश्नोईच्या संपर्कात : "राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तीन संशयित मारेकरी हत्येपूर्वी अनमोल बिश्नोईशी एका मेसेजिंग अॅपद्वारे बोलले होते. अनमोल बिश्नोई हा कॅनडा आणि अमेरिकेतून मारेकऱ्यांच्या संपर्कात होता. अनमोल बिश्नोई याच्याशी फोनवर बोलणं झालेले चार मोबाईल मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेनं आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली असून त्यात दोन शूटर आणि एका शस्त्र पुरवठादाराचा समावेश आहे," अशी माहिती पोलीस सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
प्रवीण लोणकर होता अनमोल बिश्नोईच्या संपर्कात : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर प्रवीण लोणकर यानं शुभण लोणकर याच्या सोशल माध्यमाच्या खात्यावरुन या हत्याकांडवर भाष्य केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. यावेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात प्रवीण लोणकर हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचं उघड झालं. पोलिसांनी मारेकऱ्यांनी केलेल्या मेसेजची बारकाईनं तपासणी केली. बाबा सिद्दीकी हत्याकांडात शार्प शूटर शिवकुमार गौतम आणि इतर मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याचं मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
हेही वाचा :