ETV Bharat / state

'ऐ मेरे वतन के लोगों' गीत अजरामर, संगीतकार सी. रामचंद्र यांचं जन्मगाव मात्र दुर्लक्षित - Independence Day 2024 - INDEPENDENCE DAY 2024

Independence Day 2024 : देशभक्तिपर गीतांविषयीची चर्चा 'ऐ मेरे वतन के लोगों' च्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. देशाचा स्वातंत्र्यदिन असो वा प्रजासत्ताक दिन हे गाणं सर्वत्र ऐकू येतं. उण्यापुऱ्या पाच दशकांनंतरही या गाण्याची मोहिनी तशीच आहे.

C. Ramchandra
सी. रामचंद्र यांचं संग्रहित छायाचित्र (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 9:15 PM IST

Updated : Aug 15, 2024, 9:04 PM IST

अहमदनगर Independence Day 2024 : कवी प्रदीप यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेलं, रामचंद्र चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र यांच्या कल्पक संगीतसाजानं नटलेलं आणि 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या अलौकिक स्वरांनी नटलेलं 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं आपल्या देशाच्या जिगरबाज जवानांच्या त्यागाला, बलिदानाला दिलेली सुरेल मानवंदना आहे. आज 'ऐ मेरे वतन के लोगों' चे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायिका लौकिकार्थाने आपल्यात नाहीत. याच गाण्याच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या संगीत दिग्दर्शक रामचंद्र चितळकर यांच्या जन्मगावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सी रामचंद्र यांचं जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातलं पुणतांबा. आज हे गाव, तिथलं रामचंद्र चितळकर यांचं घर, त्यांचे वंशज आदींची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न क्वचितच कुणी केला असेल. ईटीव्ही भारत हा प्रयत्न करणार आहे.

प्रभाकर चितळकर, शंकर चितळकर यांच्या प्रतिक्रया (ETV BHARAT Reporter)

सी. रामचंद्र यांचं गाव दुर्लक्षित : काही गाणी इतिहास घडवतात. किंबहुना इतिहास घडवण्यासाठीच त्यांची रचना होते. 'ऐ मेरे वतन के लोगो' हे असंच इतिहास घडवणारं गीत. हे गाणं ऐकलं आणि ज्याची गात्रं शहारली नाहीत, असा दर्दी संगीतरसिक नाही. भारतीयांच्या तीन पिढ्यांवर या गाण्याचं गारुड कायम आहे. 'ऐ मेरे वतन के लोगो' ऐकताना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले होते, हे सर्वश्रुत आहे. हे गीत लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांच्या शब्दांना उत्तम न्याय देण्याचं काम संगीत दिग्दर्शक रामचंद्र चितळकर म्हणजेच सी रामचंद्र आणि संगीतरसिकांच्या लाडक्या 'अण्णां'नी केलं. हे देशभक्तिपर गाणं तमाम भारतीयांच्या लक्षात आहे. पण गाण्याच्या संगीत दिग्दर्शकाविषयी, त्यांच्या जन्मगावाविषयी जाणून घेणं दर्दी म्हणवणाऱ्या संगीतरसिकांनाही गरजेचं वाटत नाही. सी. रामचंद्र यांचं अहमदनगर जिल्ह्यातील जन्मगाव पुणातांबा आजही दुर्लक्षित असण्याचं हेच कारण असावं.

चित्रपटसृष्टीतील अण्णा : अलबेला, आजाद, बहुरानी, देवता, इन्सानियत, झमेला, नवरंग, निराला, पतंगा, पैगाम, शहनाईसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांमधून विविधांगी गाणी देणाऱ्या सी रामचंद्र यांच्या लखलखत्या सुवर्ण कोंदणातला 'ऐ मेरे वतन के लोगों' हा तेजस्वी हिरा आहे. जन्मगाव पुणतांब्यातच रामचंद्र नरहरी चितळकर नावाच्या किशोरवयीन मुलाने चित्रपटसृष्टीत नायक बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईत येण्याआधी या युवकाच्या वडिलांनी आपल्या मुलाला संगीतसाधनेसाठी नागपूरला धाडलं होतं. तिथेच संगीत विषयाची बिजं या युवकाच्या मेंदूत पेरली गेली आणि रामचंद्र चितळकर या युवकाचा सी रामचंद्र म्हणून नावारुपाला येण्याचा प्रवास सुरु झाला. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या रुपेरी दुनियेत रामचंद्र चितळकर नावाचा तरुण उपरा ठरला असता. म्हणून त्यानं नव्या नावानं प्रवास सुरु केला. सी रामचंद्र! रामचंद्र चितळकरांचा सी रामचंद्र होण्यापर्यंतचा आणि नंतरचाही सर्व यशाचा आलेख पुणतांब्यानं पाहिला आहे.

स्मारक उभारण्याची मागणी : पुणतांबा गावी सध्या सी. रामचंद्र यांचे वंशज राहतात. हे वंशज खुद्द पुणतांबेकरांनाच ज्ञात नाहीत. 'दिव्याखाली अंधार' म्हणतात, तशी ही गत! "आजोबांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांना गावात त्यांना फारसे कोणी ओळखत नाही," अशी खंत त्यांचे नातू शंकर चितळकर व्यक्त करतात. महाराष्ट्र सरकारनं पुणतांबा गावात रामचंद्र चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांच्या नावानं एखादा स्तंभ अथवा स्मारक उभारावं, अशी त्यांच्या वंशजांची रास्त मागणी आहे.

जुन्या आठवणींना उजाळा : पुणतांबा गावात त्यांचा अडीचशे वर्षांपूर्वीचा वाडा आहे. याच वाड्यात पहिल्या मजल्यावर सी. रामचंद्र यांचं बालपण गेलं. त्यांना पेटी वाजवण्याचा छंद होता. त्यांची एक जुनी पेटी या ठिकाणी आहे. काहीशी दुरुस्ती करुन 93 वर्षीय पुतणे प्रभाकर चितळकर यांनी ती पुन्हा सुरू करण्यात यश मिळवलं. काकांची आठवण झाल्यावर त्यांच्या पेटीवर 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत प्रभाकर चितळकर वाजवतात. "सी. रामचंद्र यांचे वंशज असल्याचा अभिमान असल्याचं सांगताना त्यांचा चेहरा खुललेला असतो. प्रभाकर हे लहाणपणी सी. रामचंद्र यांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. स्वांतत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन आला की, 'ऐ मेरे वतन के लोगो' गीताचे बोल कानावर पडल्यानंतर सर्व आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो. काकांची सय दाटताच प्रभाकर चितळकर यांचं मन भूतकाळात रुंजी घालतं.

प्रतीक्षा 'ती' पहाट उजाडण्याची: सन 1962 च्या चिनी सैनिकांच्या हल्ल्यात अनेक भारतीय जवानांना हौतात्म्य आलं. त्यावेळी जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कवी प्रदीप यांनी 'ऐ मेरे वतन के लोगों' गीत लिहिलं. लता मंगेशकर यांचा या गाण्यातले स्वर कानी पडण्याचा अवकाश, मन देशभक्तीनं उचंबळून येतं. तर गाण्यातील वाद्यांच्या प्रभावी, अर्थवाही वापरानं हृदयाचा ठोका चुकतो. प्रत्येक स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनी हे गाणं कानावर पडताच या गाण्याला संगीतबद्ध करणाऱ्या रामचंद्र चितळकरांची आठवण प्रशासनाला कधी न कधी येईल आणि पुणतांब्यात चितळकरांचं अर्थात सी रामचंद्रांचं स्मारक उभं राहील, ही आशा चितळकर कुटुंबीयांच्या मनात उचल खाते.

हेही वाचा -

  1. गणवेशाविना विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा; मंत्री म्हणतात, महिना अखेर गणवेश मिळणार - School Uniform
  2. स्वातंत्र्य दिन 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं लाल किल्ल्यावर ध्वाजारोहण, देशवासीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा - Independence Day 2024
  3. स्वातंत्र्यदिना निमित्त कोयना धरणावर लेझरच्या माध्यमातून नेत्रदीपक तिरंगी रोषणाई, पाहा व्हिडिओ - Koyna Dam

Last Updated : Aug 15, 2024, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.