ETV Bharat / state

मतदान जनजागृतीसाठी राबवणार अनोखा उपक्रम, राज्यातील पहिलाच प्रयोग - Lok Sabha election - LOK SABHA ELECTION

Voting in Election : मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी आता सिग्नलवर असणाऱ्या स्पीकरवर जनजागृती पर गाणं वाजवलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिग्नल आणि रस्त्यावर असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या स्पीकरवर प्रत्येक पंधरा मिनिटांनी निवडणूक आयोगानं तयार केलेलं गाणं आणि मतदान जनजागृती पर संदेश वाजवला जाणार आहे.

Voting in Election
प्रतिकात्मक फोटो (ETV Bharat Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 6:17 PM IST

दिलीप स्वामी - जिल्हाधिकारी (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Voting in Election : मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता प्रशासनातर्फे वेगवेगळे प्रयत्न केले जातात. तरी निवडणुकीत म्हणावं तसं मतदान होत नसल्याचं समोर आलं. त्यामुळं आणखीन जनजागृती व्हावी यासाठी आता सिग्नलवर असणाऱ्या स्पीकरवर जनजागृती पर गाणे वाजवले जाणार आहे. शहरातील सिग्नल आणि रस्त्यावर असलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या स्पीकरवर प्रत्येक पंधरा मिनिटांनी निवडणूक आयोगानं तयार केलेलं गाणे आणि मतदान जनजागृती पर संदेश वाजवला जाणार आहे. शहरात जवळपास 400 ठिकाणी हा प्रयोग केला जाणार असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम असेल अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलीय.

प्रत्येक चौकात वाजेल जनजागृती गाणं : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान केलं जाणार आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 11 आणि 12 मे रोजी शहरातील सर्व रस्त्यांवर निवडणूक आयोगानं तयार केलेले जनजागृती पर गाणे आणि संदेश वाजवला जाणार आहे. शहरातील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक चौकात स्पीकर लावण्यात आले आहेत. त्यातून वाहतूक संबंधी माहिती देण्याचे काम केलं जातं. याच यंत्रणेचा वापर निवडणूक विभाग करणार आहे, शहरात जवळपास 400 ठिकाणी असे स्पीकर लावण्यात आलेले आहेत. आता त्या प्रत्येक स्पीकरवर दर पंधरा मिनिटांनी निवडणूक आयोगानं तयार केलेले जनजागृतीपर गाणे आणि मतदान करा असा संदेश दिला जाणार आहे. त्यामुळं हा अभिनव उपक्रम मतदान वाढवण्यासाठी उपयोगी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलाय.

राज्यातील पहिलाच प्रयोग : रस्त्या किंवा रस्त्यावर स्पीकर लावून मतदान जनजागृती करण्याचा राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे. मतदानाची टक्केवारी कमी होतेय. सुट्टी असल्यानं अनेक लोक कुटुंबीयांना घेऊन बाहेरगावी निघून जातात, त्यामुळं मतदान पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळंच मतदान किती महत्त्वाचं आहे, याबाबत जनजागृती केली जात आहे, त्याचाच हा भाग आहे. 11 आणि 12 मे रोजी दिवसभर हे गाणं रस्त्यावर असलेल्या स्पीकर मध्ये वाजवले जाणार आहे. इतकंच नाही तर मतदान का महत्त्वाचं आहे, याबाबत माहिती देऊन जनजागृती केली जाईल. वारंवार होणाऱ्या घोषणेनं कानावर पडणारे शब्द निश्चित मोलाचे ठरतील असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलाय.

वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहे. महिलांचे मेळावे, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे मिळावे, या माध्यमातून मतदान प्रक्रिया किती महत्त्वाची याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. इतकंच नाही तर शाळकरी मुलांना देखील आई-वडिलांनी मतदान करावं यासाठी देखील विशेष मोहीम राबवली जातेय. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करा, बाहेर जाऊ नका असा संदेश देण्याबाबत पत्र लिहिण्याची मोहीम राबवली. या सगळ्या उपक्रमातून निश्चित टक्केवारी वाढवण्यासाठी सकारात्मक बदल घडेल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येकानं मतदान करावं...; ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचं मतदारांना आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, महाराष्ट्रात 53.51 टक्के मतदान, 'या' जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.