ETV Bharat / state

मामीच्या सौंदर्यावर भाळला भाचा; शरीरसुखाची मागणी, नकार अन् थेट खून - Nephew Killed Aunt in nashik

Nephew Killed Aunt : नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या एकलहरा गेट नवीन सामनगाव रोड या ठिकाणी 6 मार्चला महिलेचा खून करण्यात आला होता. त्याची उकल नाशिक रोड पोलिसांनी काही तासातच लावल्यानंतर महिलेचा खून तिच्या भाच्यानं केल्याचं उघड झालं. हा खून एकतर्फी प्रेमातून तसेच शरीरसुखाची मागणी मान्य न केल्यानं झाल्याचं पोलिसांनी निष्पन्न केलंय.

Woman Murder Case
हत्याच
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 10:19 PM IST

महिलेच्या हत्येविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

नाशिक Nephew Killed Aunt : शरीरसुख न दिल्यानं भाच्यानंच मामीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही पती, मुलं आणि भाचा यांच्यासमवेत नाशिक रोड भागातील सामनगाव परिसरात राहत होती. भाचा हा उदरनिर्वाहासाठी त्यांच्यासोबत राहत होता. 6 मार्चच्या मध्यरात्री महिलेचा तिच्या भाचानं खून केला होता. त्यानंतर त्यानं गळ्याभोवती चाकू फिरवून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रयत्न बनाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय.

आरोपीला करणार अटक : पोलिसांनी तांत्रिक संसाधनांचा वापर करून काही तासातच महिलेच्या खुनचा तपास लावला. यानंतर पतीनं पत्नीच्या खुनाची तक्रार नाशिक रोड पोलिसांमध्ये दाखल केली. याआधारे गुन्हा नोंदवण्यात आलाय. संशयित भाच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलीस त्याला अटक करणार असल्याचं नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांनी सांगितलं.

एकतर्फी प्रेमातून हत्या झाली : "महिलेच्या पतीनं आमच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यात त्याच्या पत्नीचा एका अज्ञात व्यक्तीनं खून केला आणि भाच्यावर देखील वार केले असा उल्लेख होता. यानंतर आम्ही तपास केला असता, परिस्थितीजन्य पुरावे बघितल्यानंतर अज्ञात व्यक्ती सापडली नाही. त्यानंतर आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आधारे माहिती काढली असता, तक्रारदाराचा भाचा हा त्याच्या मामीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता अशी माहिती मिळाली. त्यानंतर आणचा खरा तपास सुरू झाला," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांनी दिली.

शरीरसुख न दिल्यानं केली हत्या : "एकतर्फी प्रेमामुळं त्यांच्यात वाद होत होते. त्याची मामी त्याला घरातून हाकलून देणार होती. याच कारणातून भाच्यानं मामीच्या मानेवर चाकूने वार करत तिची हत्या केली आणि स्वतःवरही वार करून बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तपासात हा सगळा बनाव उघड झालाय. सध्या संशयितावर रुग्णालयात उपचार सुरू असून, आम्ही त्याला अंडर ऑपरेशन ठेवलं आहे. त्यानंतर त्याला अटक करणार आहे", अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर आर शेळके यांनी दिली.

हेही वाचा :

  1. टीकेचा वार, शरद पवार! कायम पवारच का होतात विरोधकांचे टार्गेट? वाचा खास रिपोर्ट
  2. जनतेच्या पैशांतून 'मोदी की गॅरंटी' जाहिरात! आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - पृथ्वीराज चव्हाण
  3. माजू पाहणाऱ्या हुकूमशहाचे मर्दन करून भारतमातेचं रक्षण करा - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.